AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासह या राज्यातील निवडणुका पुन्हा घ्या… SIR वादात अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे काय?

Arvind Kejriwal on Election Commission: SIR वादादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका पुन्हा घेण्याची मोठी मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सर्वात भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

महाराष्ट्रासह या राज्यातील निवडणुका पुन्हा घ्या... SIR वादात अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे काय?
निवडणूक आयोग, आयुक्त, अरविंद केजरीवाल
| Updated on: Sep 23, 2026 | 2:47 PM
Share

मतदार याद्यातील विशेष सखोल उजळणी (SIR) प्रकरणावरून निवडणूक आयोगातच जुंपली आहे. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इतर दोन आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी तक्रार केल्याचा दावा करण्यात येत आहे. या वादादरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका पुन्हा घेण्याची मोठी मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सर्वात भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

या पाच राज्यातील निवडणुका पुन्हा घ्या

अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह गेल्या काही वर्षात जितक्या राज्यात निवडणुका झाल्या, तिथे पुन्हा निवडणूक घेण्याची मोठी मागणी केली आहे. यापूर्वी झालेली निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोग हा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. तर तीन लोकांचा आयोग आहे. त्यात एक मुख्य आयुक्त आणि इतर दोन आयुक्त आहेत. बैठकीत सर्वानुमते आयोगाकडून निर्णय घेतले जातात. पण इथं तर केवळ एकच व्यक्ती निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दोन्ही आयुक्तांनी मनमानी कारभाराची केली पोलखोल 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मते, मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सर्व अधिकार नाहीत. आज जे वृत्त आले त्यानुसार, ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात दोन्ही आयुक्तांनी सातत्याने आक्षेप नोंदवला. त्याविरोधात तक्रार केली. या दोन्ही आयुक्तांच्या सहमतीशिवाय कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश सोडण्यात येत आहेत. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आयुक्त सुखबीर सिंह संधू यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार, त्यांच्या परवानगीशिवाय आदेश देण्यात येत आहे. तर काही तांत्रिक आणि सॉफ्टवेअरमधील बदलाची माहिती सुद्धा त्यांना माध्यमातून कळाली. त्यासाठी त्यांची परवानगी घेण्यात आली नाही, असे केजरीवाल म्हणाले.

हा देशातील सर्वात मोठा घोटाळा

SIR हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. इंग्रजांना देशातून हकलण्यासाठी आणि देशात लोकशाहीसाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली. आता देशाची मतदार यादी यांच्या केंद्रीय कार्यालयातून तयार होत आहे, याचा अर्थ संपूर्ण देशातील मतदार यादीच नादुरुस्त करण्यात आली आहे. आतापर्यंत जितके काही बदल केले. ते सर्व रद्द करण्यात यावे. जुनी मतदार यादी पुन्हा लागू करण्यात यावी. तर मुख्य निवडणूक आयुक्तांना यासाठी त्यांनी दोषी धरले.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?