
मागच्या दोन दिवसात भारताने पाकिस्तानात घुसून हल्ले केले. भारताची कारवाई फक्त दहशतवादी आणि त्यांच्या अड्डयांविरोधात होती. पण नेहमीच दहशतवादाला आश्रय देणाऱ्या, त्यांचं पालन पोषण करणाऱ्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला केला आहे. जम्मू-काश्मीरसह भारताच्या वेगवेगळ्या राज्यात पाकिस्तानने हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. आधीपासून सुसज्ज असलेल्या भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानचा हा प्रयत्न उधळून लावला. भारताच्या S-400 सिस्टिमने पाकिस्तानची सर्व मिसाईल्स, ड्रोन्स आणि फायटर जेट्स पाडली आहेत.
आता कुठे काय घडतय ते 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या
कुठल्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात काहीही नुकसान झालेलं नाही असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं आहे.
भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. भारतीय सैन्याने लाहोरमध्ये हल्ले सुरु केले आहेत.
भारताने लाहोरवर फक्त ड्रोन्सच नाही, तर मिसाइल्स सुद्धा डागल्याची माहिती आहे.
भारताने पाकिस्तानचं एअरबॉर्न वार्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) पंजाब प्रांतामध्ये पाडलं आहे.
पठाणकोट आणि राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी आत्महघातकी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच वृत्त चुकीच आहे, असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भारतीय सैन्याच्या अत्याधुनिक S-400 मिसाइल डिफेंस सिस्टिमने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली 8 मिसाईल्स हवेतच नष्ट केली.
पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे दोन JF- 17 आणि F-16 फायटर जेट पाडल्याची माहिती आहे.
पंजाबच्या बॉर्डर भागा ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट असणार आहे.
पाकिस्तानने गुरुवारी जम्मू येथील एअरस्ट्रिपवर रॉकेट डागले. पण भारतीय सैन्याची सतर्कता आणि ताकतवर एअर डिफेन्स प्रणालीने पाकिस्तानचा हा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही.
पाकिस्तानने स्वस्तातल्या रॉकेट्सनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. हमास स्टाइलने त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे.