
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची कारवाई सुरु झाली आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च केलं आहे. इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणी हल्ला केलाय. भारताच्या या हल्ल्यानंतर लाहोर आणि सियालकोट हे एअरपोर्ट पुढच्या 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पुंछ-राजौरी क्षेत्राच्या भीमबेर येथे शस्त्रसंधीच उल्लंघन केलं. तोपखान्याचा वापर केला. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक इराद्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आज देशात मॉक ड्रील आयोजित करण्यात आलं आहे. युद्धाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यात हे मॉक ड्रील होणार आहे. आमच्या या ब्लॉगच्या माध्यमातून ‘ऑपरेशन सिंदूर’ची प्रत्येक अपडेट जाणून घ्या.
भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यांचे प्रयत्न अयशस्वी केले आहेत. हवाई सुरक्षा प्रणालीद्वारे जम्मूमधील ड्रोन नष्ट करण्यात आले.
पंजाबमधील अमृतसर शहरात रात्री ९:०० ते सकाळी ५:०० पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच पंजाबच्या सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅकआऊट लागू करण्यात आला आहे
पाकिस्तानने जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडला.
पाकिस्तानकडून पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने तोही निष्फळ ठरवला.
पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सीमेपलीकडून काश्मीरमधील कुपवाडा येथे नागरी वस्त्यांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला जात आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना रविवारपासून हार आणि नारळ अर्पण करता येणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. आता सध्या जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बंगा यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमधील नागरी वस्त्यांवर लक्ष्य साधले जात आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील बारामूला आणि कुपवाडा जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच श्रीनगर आणि अवंतीपोरा विमानतळाजवळील शाळा ९ आणि १० मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतानं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, आता पाकिस्तानच्या कंटेंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे, भारतानं मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता, त्यानंतर आता भारतानं हा मोठा निर्णय घेतला आहे.
अमेरिकन नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना
भारतानं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकन सरकारच्या सूचना
लाहोर सोडा किंवा स्वत: चा जीव वाचवा, अमेरिकन नागरिकांना सूचना
अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडावा, अमेरिकन सरकारचे आदेश
थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद
साडेपाच वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन
आज केलेल्या हल्ल्याची देणार माहिती
भारताने पाकिस्तानचं रडार सिस्टीम केलं उद्ध्वस्त
भारताने आता बहिलगर आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.
सिंधु जल करार स्थगितीनंतर बहिलगरमधून पाकिस्तानात जाणारं पाणी अडवण्यात आलेलं होतं. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. एअर स्ट्राईकमुळे घाबरलेल्या पाकिस्तानला आता वॉटर स्ट्राईकचा देखील सामना करावा लागणार आहे. बहिलगर आणि सलाल धरणाचे दरवाजे भारताने उघडले असल्याने पाकिस्तानात पुर परिस्थिती निर्माण होणार आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटलं आहे. या ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तान आणि पीओकेमधले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. या ऑपरेशनमध्ये निर्दोष व्यक्तींना लक्ष्य करण्यात आलेलं नाही. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याचं एक उदाहरण दिलं आहे, असंही यावेळी राजनाथ सिंग यांनी म्हंटलं आहे.
भारताकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानातील एअरपोर्ट बंद करण्यात आलेले आहेत. यात लाहोर, कराची, इस्लामाबाद विमानतळ बंद ठेवण्यात आलेले आहेत. कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडून आज पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला आहे. यात पाकिस्तानचे अनेक एअर डिफेन्स सिस्टिम भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत. यामुळे पाकिस्तानात अफरातफर झाली आहे. आता पाकिस्तानातील मुख्य शहरांमधली विमानसेवा देखील बंद झालेली असल्याची माहिती समोर आली आहे.
लाहोरमधील अमेरिकन दूतावासाने सर्व दूतावास कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले आहेत. लाहोरच्या मुख्य विमानतळाशेजारील काही भाग अधिकारी रिकामे करू शकतात अशी माहिती दूतावासाला मिळाली आहे. त्याच वेळी, अमेरिकेने आपल्या नागरिकांना सांगितले आहे की जर लाहोर सुरक्षितपणे सोडणे शक्य असेल तर त्यांनी तेथून निघून जावे, अन्यथा सुरक्षित ठिकाणी रहावे.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सायरन ऐकू येत आहेत. तिथे अराजकतेचे वातावरण आहे.
भारतीय सैन्याने शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केला.
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय सशस्त्र दलांनी चिथावणी न देण्याच्या धोरणाबद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे आणि पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही चिथावणीला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि पाकिस्तानने त्याचा आदर केल्यास भारत शांतता राखण्यास वचनबद्ध आहे.
काल रात्री पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पाकिस्तानने भारताच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना आणि भूज सारख्या ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व हल्ले उधळून लावले. हल्ल्यांचे पुरावे म्हणून अनेक ठिकाणांहून कचराही सापडला आहे
भारताने सांगितले की, भारतीय हवाई दलाने आज सकाळी पाकिस्तानमधील अनेक हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य करून एक महत्त्वाची कारवाई केली. 7 आणि 8 मे च्या मध्यरात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम लष्करी तळांवर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.
मोठी बातमी समोर आली आहे. भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. भारतीय सैन्याने लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केली आहे. पाकिस्तानने भारतातल्या 15 शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला आणि लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केली.
पाकिस्तानच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरुच आहे. पाकिस्तानमधील 12 शहरांवर 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे. ही बैठक सुमारे दीड तास चालली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.
जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.काश्मीरमधील आरोग्य केंद्रांवर स्पष्टपणे प्लसचे निशाण चिन्हांकित करण्यात आले आहेत. सीमावर्ती जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील यांच्यातील वाढत्या तणावामुळे पंजाबमधील गुरुदासपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुदासपूर जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण ब्लॅकआउट ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय मध्यवर्ती कारागृह गुरुदासपूर आणि रुग्णालयांमध्ये लागू नसणार, असंही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ब्लॅकआऊट दरम्यान रुग्णालयातील आणि कारागृहातील सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ रऊफ अजहर मारला गेला आहे. रऊफ अजहर कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाईंड होता.
पाकिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका सुरुच आहे. रावळपिंडी लष्करी मुख्यालयात मोठा बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे फेल ठरली आहे. या बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांनी पाकिस्तान पूर्णपणे हादरलं आहे.
पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं आहे. पाकिस्तानमध्ये अफरातफरी, गोंधळ सुरु आहे. कराची, बहावलपूर, चकवालमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच शेखुपुरा, नरवाल, रावलपिंडी, घोटकी अट्टोक, मध्येही बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच लाहोरच्या विमानतळाजवळ देखील बॉम्बस्फोट करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरुच आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच असल्याची राजनाथ सिंह यांनी माहिती दिली आहे. मुरिदकेमधील नवीन दृश्य सध्या दिसत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्पही उद्धवस्त करण्यात आला आहे. मुरिदकेमधील लष्कर-ए-तोयेबाचं मुख्यालय उद्धवस्त करण्यात आलं आहे. तसेच संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेलं नाही असं सांगितलं आहे.
केंद्र सरकारने बोलवलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे. या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारच्या पाठिशी राहण्याचे आश्वासन दिले. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी परेशन सिंदूर ची माहिती दिली.
पाकिस्तानमधील १० शहरांमध्ये १२ बॉम्बस्फोट झाले आहे. या स्फोटांमुळे पाकिस्तानमध्ये खळबल माजली आहे. पाकिस्तानमधील सियालकोट शहर रिकामे करण्यात आले आहे.
नागपूर विमानतळावर मॅाक ड्रील घेण्यात आले.,सायरन वाजताच सर्व कर्मचारी बाहेर आले. विमानतळावर सायरन वाजल्यानंतर आत असलेले सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. विमानतळ सुरक्षा यंत्रणा अलर्टवर मोडवर आली.
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकाळपासून अनेक बैठका सुरु आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्रीय गृहसचिवांची बैठक झाली.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ५० मिनिटे चर्चा झाली. पाकिस्तानकडून केले जात असलेल्या कारवाईबद्दल ही चर्चा झाली.
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला. मृत सर्व 13 नागरिक हे पुंछ मधील आहेत. तर यामध्ये आतापर्यंत 59 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांची बैठक संपली आहे. ही बैठक ५० मिनिटे चालली. पाकिस्तानकडून केले जात असलेल्या कारवाई बद्दल चर्चा झाली.
मालेगाव बनावट जन्म दाखला घोटाळा प्रकारात मोठा खुलासा झाला आहे. बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक करण्याचे षडयंत्र उघड झाल्याची माहिती अँड. शिशिर हिरे यांनी दिली. 2020 मधील मालेगावात आढळून आलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या प्रकरणाशी संबंध असल्याचा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला मुरीदके आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली होती, असे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेली विकासकामे येत्या 20 मे पर्यंत पूर्ण करण्याचे तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.
१७ वर्ष आमच्यावर हिंदु दहशतवादाचे आरोप झाले, या केसमध्ये काही सापडलं नाही. दोन तपास यंत्रणानी तपास केला. साक्षीदारांवर दबाव टाकून जबाब नोंदवले. मुख्य आरोपींचा तपास NIA ने करायला हवा, अशी प्रतिक्रिया सुधाकर चतुर्वेदी यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या माजी नेत्या प्रीती बंड आज शिंदेंच्या शिवसेनात पक्षप्रवेश करणार आहेत. शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रीती बंड यांनी अमरावती शहरात लावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहेत.
नवी दिल्ली – 11 वाजता संसद भवनात सर्वपक्षीय बैठक होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या या बैठकीत ऑपरेशन सिंदुरची माहिती देण्यात येणार आहे. बैठकीसाठी संजय राऊत , श्रीकांत शिंदे , सुप्रिया सुळे रवाना झाले आहेत.
श्रीनगरसह 18 विमानतळांवरील कामकाज तात्पुरतं बंद ठेवण्यात आलं आहे. विमान कंपन्यांनी 200 हून अधिक उड्डाणं रद्द केली आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर अमृसरमध्ये अलर्ट जारी. पुढील आदेशापर्यंत अमृतसर विमानतळ पूर्णपणे राहणार बंद.
अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या माजी नेत्या प्रीती बंड आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाणार. प्रीती बंड यांनी अमरावती शहरात लावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स.
पाकिस्तानात अनेक ठिकाणाहून स्फोटांच्या बातम्या येत आहेत. येथे लाहोर, गुजरांवाला, घोटकी, चकवाल, सिंध पंजाब सीमेसह 6 ठिकाणी एकामागून एक बॉम्बस्फोट झाले.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा तडाखाबसला आहे. शहराच्या बाहेरून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अनर्थ टळला. राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावरील स्ट्रीट लाईटचे इलेक्ट्रिक पोल जोरदार वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले.
एकाच वेळी दहा ते पंधरा पोल महामार्गावर पडले, मात्र मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने चाळीसगाव पोलीस प्रशासनाने तात्काळ रस्त्यावर पडलेले पोल बाजूला केले.
उत्तराखंड- उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानानीजवळ हेलिकॉप्टर अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. गढवालचे विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी ही माहिती दिली.
“भारतीय सैन्याने दहशतवादी कँपवर हल्ला केला. पाकिस्तान हा नापाक देश आहे. भारतीय सैन्य हे जगातील प्रोफेशनल सैन्य आहे. पाकिस्तानी सैन्याला चैरिटी नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर बलात्कार करणारं सैन्य हे आमच्याशी कशी लढणार,” अशी टीका राऊतांनी केली.
“पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि २६ भगिनीचं कुंकू पुसलं गेलं. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेतली, तेव्हा त्या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती. आमची भूमिका अशी होती की आधी ॲक्शन घ्या, नंतर आपण चर्चा करू. आता भारतीय सैन्याने जबरदस्त कारवाई केली आहे. आजची बैठक ही महत्त्वाची आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
अमृतसर- “केंद्र सरकारच्या सूचनेनुसार उत्तर आणि वायव्य भारतातील २१ विमानतळ १० मे पर्यंत बंद राहतील. येथून कोणतीही उड्डाणे होणा नाहीत”, अशी माहिती सिरीवेनेलाचे एडीसीपी-२ यांनी दिली.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सर्व पर्यटक, पाहुणे आणि स्थानिक लोकांना आवाहन केले आहे की ज्यांच्याकडे पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कोणतीही अधिक माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ असतील त्यांनी त्वरित एजन्सीशी संपर्क साधावा.
महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाने त्यांच्या सर्व सरकारी आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ आयटीआय येथे आजपासून हे प्रशिक्षण सुरू होईल, जिथे महाराष्ट्राचे माजी डीजीपी प्रवीण दीक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, असे राज्य कौशल्य विकास विभागाने म्हटले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवार दि. ०८/०५/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपासून ते शुक्रवार दि. ०९/०५/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पुणे- पाच शहरांसाठीची उड्डाणे पुण्यातून रद्द झाली आहेत. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील शहरांवर ‘एअर स्ट्राइक’ केल्यानंतर देशातील सीमेजवळ असलेले विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच शहरांसाठीची विमानसेवा बुधवारी रद्द करण्यात आली. या विमानांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकिटाची रक्कम परत अथवा पर्यायी निवडण्याची सुविधा दिली आहे.
पाकिस्तानच्या लाहोर शहरात स्फोट झाले आहेत. तीन स्फोटांची लाहोर हादरलं आहे. स्फोट कशामुळे झाले त्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्फोटामुळे लाहोरमधील नागरिकांची पळापळ.
मागील दोन ते तीन दिवसापासून जालना जिल्ह्यातल्या विविध भागात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीचा शेतकरी वर्गाला प्रचंड तडाखा बसत आहे. अंबड तालुक्यातल्या पानेगाव आणि इतर आसपासच्या सहा ते सात गावांमध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसला.
भारताने पाकिस्तानातील नऊ अतिरेकी ठिकाणांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हल्ले केले. याचवेळी पाकिस्तानी सीमेवरून भारतात येणारे विमान रोखण्यात आले. यामुळे भारतातील 250 प्रवाशांचे विमान पाकिस्तानी सीमेवरून परत गेले. हे भारतीय, अझरबैजानमधील बाकू राजधानीत अडकले आहेत. त्यांना तेथील सरकारकडून कुठलीच मदत न मिळाल्याने हे भारतीय नागरिक हवालदिल झाले आहेत.
दिंडोरी-कळवण सुरगाणा पेठ तालुक्यात वादळी पाऊस. जिल्ह्यातील चांदवड, निफाड सहकारी भागात गारांचा पाऊस. शेती पिकांना फटका फळबागा उध्वस्त कांदा भिजला. वाऱ्यामुळे नाशिक शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसात गारवा निर्माण झाल्याने दिलासा.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात मोठ नुकसान झालं आहे. दुसऱ्याबाजूला बलोच बंडखोरांनी पाकिस्तानाला धक्का दिला आहे. त्यांनी पाकिस्तानला जखमी केलं आहे. BLA ने पाकिस्तानी सैन्याची गाडी IED स्फोटात उडवून दिली. यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झाले आहेत.
#BREAKING: Baloch Liberation Army’s Special Tactical Operations Squad (STOS) targeted a Pakistan Army vehicle in a remote controlled IED attack in Mach Kund Area of Bolan, while they were preparing military operation. 12 Pakistan Army soldiers neutralised by BLA. pic.twitter.com/2nd3Z9mo9D
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 7, 2025
भुसावळमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. भुसावळ शहर आणि तालुक्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांना फटका.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून 7 आणि 8 मे च्या रात्री अंदाधुंद गोळीबार सुरु होता. भारतीय लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
During the night of May 7-8, Pakistan Army posts resorted to unprovoked fire using small arms and artillery guns across the LoC in areas opposite Kupwara, Baramulla, Uri and Akhnoor areas in J&K. Indian Army responded proportionately: Indian Army pic.twitter.com/CAM2YXDXui
— ANI (@ANI) May 8, 2025
कल्याण रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर भाजपाचा जल्लोष, ऑपरेशन सिंदूर”च्या यशानंतर भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरात महिला प्रवाशांना हळदीकुंकू लावत केला जल्लोष
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातल्या तारापूरमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले आहे. तारापूर परिसरातील विजय कॉलनी, हनुमान मंदिराच्या मैदानावर आज 4 वाजता हे प्रात्यक्षिक करण्यात आलं. हवाई हल्ला, बॉम्ब हल्ला, असा कोणताही हल्ला झाला तर काय करावं याचं प्रात्यक्षिक यावेळी नागरिकांना दाखवण्यात आलं.
सोशल मीडियावर पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्यामुळे या व्हिडीओंची पुष्ठी करून दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यात एनआयएला अडचणी येत आहेत. जे पर्यटक हल्ल्याच्या दिवशी अथवा एक दिवस आधी पहलगाम येथे होते, त्यांच्या मोबाईलमध्ये काही फोटो किंवा व्हिडीओ असतील तर त्यांनी संर्पक करावा असं एनआयएनं म्हटलं आहे.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये सीमावर्ती भागातील सद्य परिस्थितीवर अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने रात्री उशिरा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईने अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने आपल्या लष्कराला भारतावर हल्ला करण्याची पूर्ण मोकळीक दिली आहे. यावर, एनएसए अजित डोवाल यांनी आता चीनचे परराष्ट्र मंत्री आणि एनएसए वांग यी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. डोवाल यांनी सरळ उत्तर दिले आहे की भारताला पाकिस्तानसोबत युद्ध नको आहे पण जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला पुन्हा एकदा योग्य उत्तर मिळेल.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वांग यी यांच्याशी चर्चा केली आहे. एनएसए डोभाल यांनी चीनला स्पष्टपणे सांगितले आहे की भारताला पाकिस्तानसोबत युद्ध नको आहे, परंतु जर त्यांनी काहीही करण्याची हिंमत केली तर त्यांना योग्य उत्तर मिळेल.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर, बुधवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. पंजाब प्रांतीय सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे.
भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तान, पीओकेत 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलं. भारताने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
ऑपरेशन सिंदूर’नंतर पहलगाममध्ये घोषणा. वंदे मातरम, भारत माता की जय, घोषणेनं पहलगाम दुमदुमला. पहलगाममध्ये कर्नाटक, बिहारमधील पर्यटक दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याचं समाधानही व्यक्त केलं आहे.
भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. लेहमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 48 तासांसाठी म्हणजे 10 मे पर्यंत लाहोर, सियालकोट विमानतळ बंद करण्यात आले आहेत. विमानसेवा बंद असल्याने हॉटेल संघटनेनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानच्या पंजाबमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानमध्ये नागरिकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंदोत्सव पाहायला मिळत आहे. नागरिकांनी भारताचे कौतुक करत पाठिंबा दर्शवला आहे.
संपूर्ण POK ताब्यात येईपर्यंत आणि शेवटचा आतंकवादी मारला जाईपर्यंत ही लढाई अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
छत्तीसगड राज्यात सीआरपीएफ व डीआरजी पोलिसांच्या संयुक्त अभियानात वीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. ऑपरेशन गरुडा जवळपास पंधरा दिवसापासून छत्तीसगडच्या करेगट्टा पहाडीवर सुरू आहे . आज पंधरावा दिवस असून आज पहाटे सीआरपीएफ छत्तीसगड पोलिसांनी 20 ते 22 नक्षलवाद्यांना ठार मारले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली. गेल्या दोन तासांपासून ही बैठक सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री आमित शहा बैठक संपवून बाहेर पडले आहेत. यावेळी त्यांनी लष्कराचे कौतुक केले.
लवकरच भारताचं स्पेस स्टेशन असेल. 2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल, अशी मोठी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. प्रत्येक भारतीयांसााठी सॅटेलाईट काम करणार असे ते म्हणाले.
इस्रोने एका मिशनमध्ये एकाच वेळी १०० सॅटेलाईट सोडण्याची कामगिरीही केली, अशी कौतुकाची थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आमच्या सॅटेलाईटद्वारे प्रत्येक भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. इंडियाकडे २५० हून अधिक स्पेस स्टार्ट आहेत. आमच्याकडे आधुनिक सॅटेलाईट टेक्नॉलॉजी आहे. महिला शास्त्रज्ञांकडून आमच्या मिशनचं नेतृत्व केलं जात आहे, ही मोठी गोष्ट आहे.
भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. पाकव्याप्त काश्मीरच नाही तर पंजाब प्रांतातील लाहोरजवळील दहशतवादी स्थळांवर भारताने एअर स्ट्राईक केला. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले. त्यानंतर बलुचिस्तानमध्ये बलोच नेत्यांनी आणि नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. खास पांरपारिक गीतांवर त्यांनी ठेका धरला.
दहशतवाद्यांना लपण्यासाठी कुठेही जागा नाही, हे लक्षात ठेवा असा इशारा देत इस्त्रायलने भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले. त्यांनी भारताला पूर्ण पाठिंबा दिला.
भारताचे निर्णायक प्रत्युत्तर दिल्याबद्दल उमरगा तालुक्यात भाजपच्या वतीने बाळासाहेब ठाकरे चौकात फटाक्याची आतिषबाजी करत भारत माता की जय, घोषणा देत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर… 9 ठिकाणी हवाई हल्ला… मुजफ्फराबागमधला लष्कर – ए – तैयबाचा सवाई नल्ला कॅम्प उद्ध्वस्त… याठिकाणी 50 ते 100 अतिरेकी नेहमी उपस्थित असायचे…
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते झाल्याचं कळताच पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष करण्यात आला… थरमॅक्स चौकात किर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला… यावेळी हातात तिरंगा घेत, भारत माता की जय, लष्करी सेनेचा विजय असो असे नारा लावण्यात आले. चौकाचौकात नागरिकांना पेढे भरवत शहरवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
“कोणत्याही सैन्य ठिकाण्याला निशाणा करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही नागिरकांचा यात मृत्यू झाल्याचा रिपोर्ट अद्याप समोर आला नाही,” असं कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं.
“ऑपरेशन सिंदूर राबवताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती” अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
“पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना टारगेट केलं गेलं. या तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय”, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
“भारताविरोधात पुढेही हल्ले होऊ शकतील, त्यामुळे त्यांना रोखणं आणि प्रत्युत्तर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असे संकेत गुप्तचर यंत्रणांनी दिले”, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.
“एका समूहाने स्वत:ला TRF म्हणत पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटना आहे. हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले आहेत”,अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
“पहलगाममधील हल्ला हा अत्यंत निर्दयी होती. कुटुंबीयांच्या समोर पर्यटकांना गोळ्या झाडल्या गेल्या. हा हल्ला स्पष्टपणे जम्मू-काश्मीरमधील सामान्य स्थितीला धक्का पोहोचवण्यासाठी होता. तिथल्या पर्यटनाला नुकसान पोहोचवण्यासाठी होता. तिथल्या विकास आणि प्रगतीला नुकसान पोहोचवायचं होतं,” असं पत्रकार परिषदेत म्हटलं गेलं.
भारतीय सैन्य, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला भारतीयांवरील दहशतवादी हल्ल्यांची दृश्ये दाखवण्यात आली.
सांगली – जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युतर म्हणून भारताने ऑपरेशन ‘सिंदूर’ राबवल्याबदल सांगलीत श्री शिवपतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मारुती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करत आणि साखर पेढे वाटत पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भारतीय सैन्य, परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होईल. या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
वाघाने फक्त पंजा उगारलेला आहे अजून जबडा उघडायचा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री योगेश कदम यांनी एअर स्ट्राईकवर दिली आहे. “आपण POK आता ताब्यात घेतलं पाहिजे. पाकिस्तानचा जो दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे तो कायमस्वरुपी संपवला पाहिजे,” असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात वुयान, पंपोर भागात अज्ञात लढाऊ विमानाचे अवशेष सापडले असून, स्थानिक नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी केलीये. या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याने पूंछ, राजौरी जिल्ह्यांतील नियंत्रण रेषेवर (LoC) असलेल्या कृष्णा घाटी, शहापूर, मानकोट, लम, मंजाकोट आणि गमबीर ब्राह्मणा गावांवर जोरदार तोफगोळ्यांचा मारा केलाय. सध्या सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
“रात्री 9 ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आला आहे. 26 निरअपराध लोकांना मारल्यानंतर जनतेची भावना होती की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो, कारण देशाला याची गरज होती. ती गरज ओळखून ज्याप्रमाणे हल्ला केला ती निश्चितच स्वागतार्ह आहे. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचे सासरे जयंत भावे यांनी देखील ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली. “भारताने जी कारवाई केली ती अतिशय योग्य आहे. या कारवाईची आम्ही वाट पाहत होतो. ज्या लोकांना प्राण गमवावा लागला त्यांना आज खरी श्रद्धांजली मिळाली. या कारवाईमुळे आतंकवाद कमी होण्यास नक्कीच मदत होईल,” असं भावे म्हणाले.
लष्कर ए तोयबाच्या 2 मोठ्या कमांडरचा खात्मा झाला आहे. मुदस्सीर आणि हाफीज अब्दुल मलिक हे दोघ ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुरीदके येथे झालेल्या हल्ल्यात हे दोन कमांडर मारले गेले.
गेल्या आठवड्यात जे काही घडले त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थ होते. लोक पलीकडून येतात हल्ला करतात, यामध्ये कुठल्या सरकारला बघ्याची भूमिका घेता येत नाही. जो काश्मीरचा भाग पाकिस्तान घेतला तिथं हल्ला केला. या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथं दारूगोळा ठेवला जातो. पाकिस्तानची बॉर्डर आपण ओलांडून गेलो नाही ती काळजी हवाई दलाने घेतली. आज सगळा देश AIR फोर्स च्या पाठीमागे आहे, अशी आमची भूमिका – शरद पवार
भारताने 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये. यापुढेही लष्कर हे दहशतवादी हल्ले नेस्तनाबूत करेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला इशारा
आपल्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी अढळ निर्धार दाखवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला करत भारतीय सैन्याने दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
आम्ही आमच्या सैनिकांच्या आणि आमच्या राष्ट्राच्या समर्थनात एकजूट आहोत. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. जय हिंद – अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून निवदेन जारी करण्यात आले आहे. पाक लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला असून ३३ लोक जखमी झाले आहेत. पाकिस्ताा ६ ठिकाणी २४ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.