R37 M : रशियाकडून भारताला एक खतरनाक शस्त्राची ऑफर, नुसता स्पीड ऐकून पाकिस्तान येईल टेन्शनमध्ये

R37 M : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या योजना धुळीस मिळवल्या. पाकिस्तानने बॅलेस्टिक मिसाइल्सनी केलेले हल्ले S-400 ने परतवून लावले. रशियाच्या S-400 सिस्टिमने आपली उपयुक्तता सिद्ध केली. आता रशियाने भारताला आणखी एका अशा घातक शस्त्राची ऑफर दिली आहे, त्यामुळे पाकिस्तानची झोप उडेल. भारताकडे सध्या हे शस्त्र नाहीय, तरी आपण त्यांचे एअरबेस उडवले. उद्या हे शस्त्र आल्यानंतर पाकिस्तानची काय हालत होईल?.

R37 M : रशियाकडून भारताला एक खतरनाक शस्त्राची ऑफर, नुसता स्पीड ऐकून पाकिस्तान येईल टेन्शनमध्ये
India-Russia-Pakistan
| Updated on: Jun 06, 2025 | 1:43 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आहे. भारताने रशियाकडून विकत घेतलेल्या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तान विरुद्ध आपली उपयुक्तता सिद्ध केली. आता रशियाने भारताला आणखी एक खतरनाक शस्त्र विकत घेण्याची ऑफर दिली आहे. निश्चितच हे शस्त्र गेमचेंजर ठरेल. भारत आणि रशियामध्ये ही डील झाली, तर भारताची हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत होईल. रशियाने भारताला R-37 मिसाइलची ऑफर दिली आहे. रशियाने आपलं R-37M हे दीर्घ पल्ल्याच हायपरसोनिक मिसाइल विकत घेण्याचा भारताला प्रस्ताव दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही R-37M मिसाइल्स इंडियन एअर फोर्सच्या Su-30MKI फायटर जेट्समध्ये फिट करता येऊ शकतात. भारत-रशियामध्ये ही डील झाल्यास पाकिस्तान आणि चीनच्या हवाई शक्तीच्या तुलनेत भारताची ताकद वाढेल.

R-37M ला NATO कोडनेम AA-13 Axehead नावाने सुद्धा ओळखली जाते. जगातील ही सर्वात वेगवान, लांब पल्ल्याची मिसाइल आहे. याचा वेग Mach 6 म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा सहापट जास्त आहे. 300 ते 400 किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूच्या विमानाला हे मिसाइल लक्ष्य करु शकते. म्हणजे पाकिस्तानकडे असलेलं F-16, J-10 एकही विमान या मिसाइलच्या रेंजमधून सुटणार नाही. रशियाच्या विम्पेल डिजाइन ब्यूरोने हे मिसाइल विकसित केलं आहे. शत्रुची AWACS (एयरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टम्स), टँकर विमान आणि फायटर एअरक्राफ्ट पाडण्यासाठी या मिसाइलचा वापर केला जातो. R-37M मिसाइलमुळे भारताच्या फायटर जेट्सना आपल्या हद्दीत राहून शत्रुच्या विमानांना टार्गेट करता येईल. त्यासाठी सीमा ओलांडण्याची गरजच पडणार नाही. यामुळे फायटर पायलट्सची सुरक्षितता आणि मारक शक्ती दोन्ही वाढेल.

7,400 किलोमीटर प्रति तास वेग

R-37M ही टेक्नोलॉजीच्या दृष्टीने खास मिसाइल आहे. याची रेंज 300 ते 400 किलोमीटर आहे. 510 किलोग्रॅम या मिसाइलच वजन आहे. त्याशिवाय यात 60 किलोग्राम हाई-एक्सप्लोसिव फ्रेगमेंटेशन वॉरहेड आहे. R-37M चा हाइपरसोनिक स्पीड 7,400 किलोमीटर प्रति तास आहे. अत्यंत कमी वेळात हे मिसाइल आपल्या शत्रुला टार्गेट करु शकतं.

आपल्या लक्ष्याचा स्वत:च माग काढतं

या मिसाइलच्या गायडन्स प्रणालीमध्ये इनर्शियल नेविगेशन, मिड कोर्स अपडेट आणि एक्टिव रडार होमिंग टेक्निक आहे. या मिसाइलची फायर अँड फर्गेट क्षमता आहे. लॉन्च केल्यानंतर हे मिसाइल आपल्या लक्ष्याचा स्वत:च माग काढतं. त्यामुळे पायलट दुसऱ्या धोक्यांकडे आपलं लक्ष केंद्रीत करु शकतो.