‘टांगें कांप रहीं और वो काला बैंगन…’, सीमाच्या पाकिस्तानात परतण्याच्या चर्चांवर पहिल्या पतीचे मोठे वक्तव्य
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवण्यात येत आहे. सीमा हैदर देखील पाकिस्तानातून भारतात आली होती. तेव्हापासून तिचा पती गुलाम हैदर तिला परत पाठवण्याची मागणी करत आहे. अशा परिस्थितीत आता गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की सीमाला तिच्या कृत्यांचा परिणाम भोगावा लागणार आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये त्याने पहलगाम हल्ल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या पतीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गुलाम हैदरने आपली पत्नी सीमा हैदर, तिचा नवा पती सचिन मीणा आणि वकील एपी सिंह यांना जोरदार फटकारले आहे. गुलाम हैदर म्हणाला, “सीमाचे पाय आता कापत आहेत. तिला वाटत आहे की गुलाम हैदर आता थकला असेल आणि तिच्याविरुद्ध काही करणार नाही. पण तिचा हा विचार चुकीचा आहे. मी माझ्या चार मुलांसाठी लढा सुरू ठेवणार आहे.”
गुलाम हैदरचा हा व्हिडिओ पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच समोर आला आहे. खरं तर, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सीमा हैदर ही देखील पाकिस्तानी आहे. ती मे 2023 मध्ये नेपाळमार्गे भारतात आली होती. ती आपल्या चार मुलांसह भारतात आली होती. त्यानंतर तिने तिचा भारतीय बॉयफ्रेंड सचिन मीणाशी लग्न केलं. काही काळापूर्वीच सीमाला एक मुलगी झाली, जी सचिनची आहे.
वाचा: शिमला करार नेमका काय आहे? जो रद्द करण्याची धमकी पाकिस्तान देत आहे
अशा परिस्थितीत असा अंदाज लावला जात आहे की इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे सीमालाही परत पाठवले जाईल. पण सीमा हैदरचे वकील एपी सिंह म्हणाले, “पहलगाम हल्ल्याची माहिती मिळाल्यावर सीमा खूप अस्वस्थ आणि दु:खी आहे. ती स्वतः रुग्णालयात आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.” त्यांनी पुढे सांगितलं की, सीमाने पाकिस्तानातून सनातन धर्म स्वीकारून नेपाळ गाठलं होतं. नेपाळमध्ये तिने सचिन मीणाशी लग्न केलं आणि भारतात येऊनही दोघांनी पूर्ण रीतिरिवाजांसह लग्न केलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, सीमाचे सर्व कागदपत्रे एटीएस, गृहमंत्रालय आणि भारत सरकारकडे जमा आहेत. राष्ट्रपतींकडे याचिका प्रलंबित आहे. सीमाच्या जामिनादरम्यान न्यायालयाने जे आदेश दिले होते, त्यांचं पूर्णपणे पालन सीमा करत आहे. त्या आदेशांनुसारच सीमा आपल्या सासरी रबूपुरा येथे राहत आहे. ती कायद्यावर विश्वास ठेवते आणि उत्तर प्रदेश सरकार, भारत सरकार आणि न्यायालयाच्या आदेशांचं पूर्णपणे पालन करत आहे. त्यांनी सांगितलं की, सीमा यापुढेही सर्व आदेशांचं पालन करत राहील.
“सीमाचे पाय थरथर कापत आहेत”
पण आता गुलाम हैदरचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, “सीमाचे पाय थरथर कापत आहेत आणि तो काळा वांगा सचिन किती काळ वाचणार आहे. आता निर्णयाची वेळ आली आहे. त्यांना त्यांच्या कृत्यांचा परिणाम भोगावा लागेल. एपी सिंहही त्यांना वाचवू शकणार नाही.” गुलाम हैदरच्या या व्हिडिओनंतर अंदाज लावला जात आहे की, त्याला कदाचित आशा आहे की इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे सीमालाही परत पाठवलं जाईल. मात्र, गुलाम हैदरने या व्हिडिओमध्ये पहलगाम हल्ल्याचा कुठेही उल्लेख केलेरपकला नाही.
