बाथरूम मर्डरचा भयानक धसका! कॉलनीतील पुरुषांचा मोठा निर्णय, एका झटक्यात सोडली…

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे दारूच्या व्यसनाने त्रस्त बायकोने पतीची हत्या करून त्याला बाथरूममध्ये पुरले. 45 दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. या भयानक घटनेने कॉलनीतील पुरुषांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपलीही बायको असेच काही करेल या भीतीने त्यांनी दारू पिणे कायमचे सोडून दिले आहे, असा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

बाथरूम मर्डरचा भयानक धसका! कॉलनीतील पुरुषांचा मोठा निर्णय, एका झटक्यात सोडली...
Agra case
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 06, 2026 | 5:25 PM

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बायकोने नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. नवऱ्याची हत्या करून त्याला बाथरूममध्येच गाडण्यात आलं. तब्बल 45 दिवस ती पोलिसांना बहाणे बनवत होती. अखेर एका चुकीमुळे ती पकडल्या गेली आणि बाथरूम मर्डर कांड उजेडात आलं. नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. सतत भांडणं व्हायची. या भांडणाला ती वैतागली होती. त्यामुळेच तिने नवऱ्याचा कायमचा काट काढायचं ठरवलं. या घटनेने आरोपी रुबी ज्या कॉलनीत राहत होती, त्या कॉलनीतील पुरुषांमध्ये मोठी दहशत माजली आहे. या घटनेनंतर कॉलनीतील पुरुषांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सुरेंद्र शर्मा असं या मयत व्यक्तीचं नाव आहे. त्याची पत्नी रूबीने त्याचा काटा काढला. आग्र्यातील सिंकदरा येथील रेणुका धाम कॉलनीत हे जोडपं राहत होतं. या घटनेनंतर या कॉलनीतील पुरुष बिथरले आहेत. लोक बोलण्यासही धजावत नाहीयेत. इतकी दहशत त्यांच्या मनात बसली आहे. नवऱ्याच्या दारूला वैतागल्यामुळेच रूबीने त्याला मारून टाकलं. त्यामुळे आमच्या मनातही दहशत निर्माण झाली आहे. आम्हीही दारू पितो. त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. दारू पिऊन घरी गेल्यावर आमच्यासोबतही आमच्या बायका असं काही करतील ही भीती आमच्या मनात आहे. त्यामुळेच आम्ही आता दारू सोडली आहे, असं कॉलोनीतील पुरुषांनी सांगितलं. म्हणजेच या एका घटनेमुळे धस्तावलेल्या अट्टल दारूड्यांनी जीव वाचवण्यासाठी दारू सोडली आहे. आपलाही बाथरूम मर्डर होऊ नये, असं अनेकांना वाटत आहे.

झोपेच्या गोळ्या दिल्या

रेणुका धाम कॉलनीत राहणाऱ्या रुबीला तिचा नवरा सुरेंद्र नेहमी मारहाण करायचा. दारूच्या नशेत तो तिला मारझोड करायचा. त्यामुळे ती वैतागली होती. दोन मुलं झाली तरी नवऱ्याची सवय काही सुटत नव्हती. त्यामुळे संसारात काहीच अलबेल नव्हतं. त्यामुळेच तिने नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. खिरीतून या गोळ्या देऊन तिने नवऱ्याचा कायमचा काटा काढला. नवऱ्याला मारल्यानंतर तिने घरातच नवऱ्याला पुरलं.

नेमकं काय घडलं?

घरातील बाथरूममध्ये नवऱ्याला पुरलं. त्यावर माती टाकली आणि मिस्त्रीला बोलावून फरशी लावून घेतली. त्यानंतर रोज ती त्या फरशीवर अंघोळ करायची. कुणालाही त्याची खबर नव्हती. नवरा तीन हजार रुपये घेऊन घरातून गायब झाला. घरातच मोबाईल ठेवल्याचं ती सर्वांना सांगत होती. पोलिसांनाही तिने तसंच सांगितलं. पण तिच्या नवऱ्याच्या एका गुन्ह्यासाठी पोलीस तिच्या घरी आले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा नवरा घरातून गायब असल्याचं रूबीने सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी रूबीचा फोटो काढला. पोलिसांनी फोटो काढल्याने रुबी बिथरले. तिला वाटलं आपलं बिंग फुटलं. कुणी तरी पोलिसांना सर्व सांगितलंय.

त्यामुळे ती हादरून गेली. तिने लगेच तिच्या दीराला अनिल शर्माला फोन केला. अनिल आल्यावर तिने त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे अनिलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने पोलिसांना फोन करून सर्व माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि बाथरूम खोदला असता त्यात त्यांना सुरेंद्रचा सांगाडा सापडला. ही वार्ता संपूर्ण देशात पसरली. या घटनेने कॉलनीतील लोक आणखीनच दहशतीखाली गेले.

Follow Us