
अहमदाबादमध्ये काल गुरूवारी १.३० वाजता झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्यासह देशही हादरला आहे. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान एआय-१७१ अहमदाबादहून उड्डाण करत होते अन् अवघ्या काही क्षणात ते कोसळले. एअर इंडिया विमानाच्या झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय. हे विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळावरून विमानाचे अवशेष आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरू आहे. यादरम्यान एक आश्चर्यकारक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
दुर्घटनास्थळावरून बचाव पथकाला एक भगवद्गीता सापडली आहे. विशेष म्हणजे भीषण अपघातात सर्व काही जळून खाक झाले. विमानाचे लोखंडी अवशेषही पूर्णतः वितळले, मात्र कागदाची भगवद्गीता जशीच तशी हाती लागल्याचा दावा केला जात आहे. विमान अपघातात २६५ प्रवाशी जळून राख रांगोळी झालेली असताना या ढिगाऱ्यात भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित सापडल्याचा दावा केला जात आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचं एकही पान जळालेलं नाही. किंवा या भगवद्गीतेचा एकही कोपरा फाटला ना जळून खाक झाला.
In the wreckage of shattered dreams and steel, the Bhagavad Gita stood untouched as if God left a message.
Jai Shree Krishna! 🙏🏼🚩#AirIndiaCrash #PlaneCrashAhmedabad pic.twitter.com/j6wQBNfMHX
— Kashmiri Hindu (@RohitInExile) June 13, 2025
या व्हिडिओमध्ये विमान अपघाताची जागा दाखवण्यात आली आहे. बचाव कार्यादरम्यान, एक व्यक्ती भगवद्गीता घेऊन जाताना दिसत आहे. ही भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आहे. एक व्यक्ती गीतेची पाने देखील उलटून दाखवत आहे. हा व्हिडिओ गुजराती भाषेत असून भगवद्गीता भीषण अपघातात सुरक्षित आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिथे उपस्थित असलेले लोक याला चमत्कार म्हणून पाहत आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
विमान अपघातानंतर गंभीर स्वरूपात जळालेल्या प्रवाशांच्या अवस्थेत आणि खाक झालेल्या विमानाच्या अवशेषांमध्ये भगवद्गीता सुरक्षित हाती लागणं हा चमत्कार मानला जात आहे. इतकंच नाहीतर हा प्रकार लोकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक बनले आहे.