त्या प्रवाशाला अपघाताची आधीच कुणकुण लागली होती? ट्विट करत काय दिले संकेत?

अहमदाबादमध्ये आज एअर इंडियाचे एक विमान कोसळले. यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.मात्र आता एका प्रवाशाने या विमानाबाबत केलेला दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्या प्रवाशाला अपघाताची आधीच कुणकुण लागली होती? ट्विट करत काय दिले संकेत?
plane crash News
| Updated on: Jun 12, 2025 | 8:12 PM

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आज एअर इंडियाचे एक विमान कोसळले. यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान कोसळल्यानंतर विमानाला भीषण आग लागली आणि यात सर्व प्रवासी जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. या विमान अपघाताची सखोल चौकशी केली जाणार आहे. मात्र आता एका प्रवाशाने एक दावा केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उड्डाणापूर्वी एका प्रवाशाने विचित्र गोष्टी पाहिल्या

अहमदाबादमधील या अपघातानंतर आकाश वत्स नावाच्या व्यक्तीने X वर धक्कादायक माहिती शेअर केली आहे. त्याने लिहिले की, “मी याच विमानात दोन तासांपूर्वी दिल्लीहून अहमदाबादला आलो होतो. मला विमानात काही विचित्र गोष्टी दिसल्या होत्या. याचा एक व्हिडिओही बनवला होता. जो मी @airindia ला ट्विट करणार होतो असं या प्रवाशाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रवाशाला अपघाताची कुणकुण लागली होती का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

एसी-टीव्ही बंद

आकाश वस्तने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सांगत आहे की, ‘टीव्ही स्क्रीन काम करत नाही, एसीही चालत नाही. केबिन क्रु ला सुचित करण्याचे बटन काम करत नाही. लाईटही ऑन होत नाही. एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. मलाही घाम येत आहे.’ आकाशने दिलेल्या या माहितीमुळे विमानात आधीपासूनच दोष होता का हा प्रश्न उपस्थित होत आहे.’

आकाश वत्सने दिलेली ही माहिती आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आकाशने दिलेली माहिती खरी की खोटी याबाबत अजून कळू शकलेले नाही. मात्र त्याने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.