Air India Plane Crash : इंजिन खराब की इमारतीला धडकलं?; 242 प्रवाशी घेऊन निघताच 15 मिनिटात कसं झालं विमान क्रॅश?

Ahmedabad Air India Plane Crash : मोठी विमान दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. नेमकं काय झालं? जाणून घ्या...

Air India Plane Crash : इंजिन खराब की इमारतीला धडकलं?; 242 प्रवाशी घेऊन निघताच 15 मिनिटात कसं झालं विमान क्रॅश?
Ahmedabad Air India Plane Crash
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 12, 2025 | 2:35 PM

अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघातामुळे खळबळ उडाली आहे. या अपघाताची दोन संभाव्य कारणे समोर आली आहेत. पहिले कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे हा अपघात घडला. दुसरे म्हणजे, प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर जाऊन आदळले आणि त्यानंतर ते जळून खाक झाले. या घटनेनंतर अहमदाबादमध्ये धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. सध्या, बचाव कार्य सुरू असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले

एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. अहमदाबादमध्ये हा अपघात झाल्याने सर्वत्र धूर आणि मलबा पसरला आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानात 242 प्रवासी होते.

वाचा: मोठी अपडेट! पतीच्या हत्येनंतर सोनम इंदौरला आली, बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये…

अहमदाबादमधील एअर इंडियाचे विमान कोसळले

अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात घडला आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात 242 प्रवासी होते. टेकऑफनंतर 15 मिनिटात विमान दुर्घटना झाली आहे. ही घटना मेघानीनगर परिसराजवळ घडली. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची माहिती समोर आलेली नाही.