AI India Summit: एआय सर्व काम करेल, पण … एआय समिटमध्ये ऋषी सुनक यांचा कुणावर निशाणा, सरकारची वाढली चिंता

India AI Impact Summit 2026: दिल्लीत सध्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 ची जोरदार चर्चा सुरू आहे. जगातील अनेक दिग्गज या मंचावर त्यांचे मत मांडत आहेत. भारत एआय क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी ब्रिटनेच माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक चिमटा काढला आहे, त्याचीच सध्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे.

AI India Summit: एआय सर्व काम करेल, पण ... एआय समिटमध्ये ऋषी सुनक यांचा कुणावर निशाणा, सरकारची वाढली चिंता
ऋषी सुनक यांच्या भाषणाची चर्चा
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 20, 2026 | 9:43 AM

Britain former PM Rishi Sunak: ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचे भाषण गुरूवारी नवी दिल्लीत भारत मंडमपमध्ये चांगलेच गाजले. त्यांनी हटके अंदाजात आणि बेधडक मत मांडलं. इंडिया एआई इम्पॅक्ट समिट, 2026 मध्ये त्यांच्या खास शैलीतील भाषणांने सर्वांचं लक्ष वेधले. सुनक यांना त्यांचे सत्र सुरू करण्यास थोडा उशीर झाला. त्यांनी या उशीराबद्दल उपस्थितांकडे जाहिर दिलगिरी व्यक्त केली. पण त्याचवेळी ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी दिल्लीतील वाहतूक कोंडीवर निशाणा साधला.

दिल्लीतील वाहतूक कोंडीवर निशाणा

ऋषी सुनक या सत्राची सुरुवात करताना म्हणाले की मला माफ करा. मला काही मिनिटे उशीर झाला. पण या उशीरासाठी मीच जबाबदार आहे. आपण या आठवड्यात बघितलं की, एआय कशी सर्व कामं करत आहे. पण एआयला दिल्लीच्या वाहतूक कोंडीवर काही उपाय सापडला नाही. त्यांनी असे म्हणताच भारत मंडपममध्ये एकच हश्या पिकला. अनेकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर सुनक यांच्या हजरजबाबीपणाचे कौतुकही झाले. त्याचवेळी त्यांच्या या चिमट्याने दिल्ली सरकारची चिंताही वाढवली.

भारत एआय महाशक्ती

या आठवड्यात भारत मंडपममध्ये जे काही दिसले, ते असाधारण आहे. हे एक मोठे उदाहरण आहे. पंतप्रधान मोदींचे हे मोठे यश आहेच. पण त्याचवेळी तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी आणि त्याचा उपयोग करण्यासाठी सर्वांच्या ऊर्जेचाही परिपाक आहे. जगातील कोणत्याही देशात अशी ऊर्जा दिसत नाही. ही एक खास गोष्ट आहे असे कौतुक ऋषी सुनक यांनी केले. या कारणामुळेच स्टॅनफोर्ड(जागतिक क्रमवारी ठरवणारी संस्था) नुसार, भारत आता जागतिक स्तरावर एआय महाशक्ती म्हणून अग्रेसर आहे. तो आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीयांना या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे.

आमच्यासाठी हे थोडे निराशाजनक आहे. कारण भारत झपाट्याने इथपर्यंत पोहचल्याने त्याने ब्रिटनला मागे टाकले आहे. पण आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अजूनही इंग्लंड आघाडीवर असल्याचे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आताच सांगितले, हे आमच्यासाठी सध्यातरी महत्त्वपूर्ण आहे असे सुनक म्हणाले.