
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता सातत्याने एअर इंडियाच्या विमानांमधील बिघाडाबाबत बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच चेन्नई विमानतळावर एका एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लॅडिंग करण्यात आली. अहमदाबादच्या विमान अपघातात फक्त एकच प्रवासी वाचला बाकी सर्व प्रवाशांचा जीव या अपघातात गेला. आता नुकताच एक अतिशय धक्कादायक माहिती ही दिल्लीहून सिंगापूरला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाबद्दल येत आहे.
एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवले खाली
दिल्ली विमानतळावर सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवण्यात आले. तब्बल दोन तास हे प्रवासी विमानात बसले होते. मात्र, त्यांना परत विमानातून उतरवण्यात आले. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे हे विमान दिल्लीहून सिंगापूरला निघाले होते. विमानातील सर्व यात्री विमानात आपआपल्या सीटवर बसले देखील होते. मात्र, विमानातून खाली उतरण्याची विनंती त्यांना करण्यात आली.
तब्बल दोन तास प्रवासी विमानात बसून
एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. एअर इंडियाचे विमान AI2380 रात्री 11 वाजता दिल्ली विमानतळावरून निघणार होते. परंतु ते उशिराने उड्डाण करण्यात आले. प्रवासी तब्बल दोन तास ताडकळत बसले होते. अनेक प्रयत्न करूनही समस्या सुटत नसल्याने शेवटी प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. याबद्दलची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आलीये. एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने उड्डाणास उशीर
विमानातील एअर कंडिशनिंग सिस्टीम काम करत नव्हती. हेच नाही तर विमानातून लाईट देखील जात येत होती. सुमारे दोन तास विमानात बसल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीकडे नेण्यात आले. अहमदाबादमधील विमानात देखील अपघाताच्या काही वेळ अगोदर प्रवाश्यांनी कुलिंग होत नसल्याचा दावा केला होता. आता परत एकदा दिल्लीहून सिंगापूरच्या निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात देखील बिघाड झाला.