बोईंग विमानांच्या इंधन स्विचबाबत एअर इंडियाकडून महत्वाची माहिती, अहमदाबाद अपघातानंतर झाली तपासणी

बोईंग ७८७ विमानाची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग यंत्रणेत त्यांना कोणतीही समस्या आढळली नाही. आम्ही विमानाचे सर्व पैलू तपासले आहेत.

बोईंग विमानांच्या इंधन स्विचबाबत एअर इंडियाकडून महत्वाची माहिती, अहमदाबाद अपघातानंतर झाली तपासणी
| Updated on: Jul 17, 2025 | 8:04 AM

गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातानंतर बोईंग विमानांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळेच एव्हिएशन सेफ्टीने सर्व बोईंग विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचचे लॉक तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एअर इंडियाकडून सर्व बोईंग विमानांच्या इंधन स्विचचे लॉक तसासण्यात आले. बुधवारी एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचची तपासणी करण्याचे काम पूर्ण केले. या तपासणीत बोईंगच्या इंधन लॉकिंग सिस्टममध्ये कोणताही दोष आढळून आला नाही, असे विमान कंपनी एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

यामुळे तपासणी करण्याचे आदेश

डीजीसीएकडून अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाचा अहवाल १२ जुलै रोजी आला. त्या अहवालात इंधन लॉकींग सिस्टीम बंद झाल्यामुळे इंजिनाला इंधन पुरवठा झाला नाही, असे म्हटले होते. त्यानंतर १४ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या बोइंग ७८७ आणि ७३७ विमानांच्या इंधन स्विच लॉकींग सिस्टमची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. इंधन स्विच लॉकिंग सिस्टमची तपासणी २१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

कंपनीने काय म्हटले?

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोईंग ७८७ विमानाची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग यंत्रणेत त्यांना कोणतीही समस्या आढळली नाही. आम्ही विमानाचे सर्व पैलू तपासले आहेत. एअर इंडियाने म्हटले की, आमच्या अभियांत्रिकी पथकाने सर्व बोईंग ७८७ विमानांच्या एफसीएस (इंधन नियंत्रण स्विच) च्या लॉकिंग यंत्रणेची तपासणी सुरू केली. तसेच सर्व बोईंग ७८७विमानांमध्ये थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल बदलण्यात आले. एफसीएस हा या मॉड्यूलचा एक भाग आहे. इंधन नियंत्रण स्विच विमानाच्या इंजिनमध्ये इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतात.

अहमदाबादवरुन लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. टेकऑफ घेतल्यानंतर काही सेंकदात विमान क्रॅश झाले होते. या अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या कारणांची तपासणी करण्याचे काम करण्यात आहे. यासंदर्भात प्राथमिक अहवालात म्हटले होते की, विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर दोन्ही इंजिन अचानक बंद झाले. या अहवालावर टीका झाल्यानंतर बोइंगच्या एफसीएसची तपासणी करण्याचे आदेश दिले गेले.