
अहमदाबादेत एअर इंडियाचे लंडनला जाणारे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान क्रॅश झाले आहे. या विमानात 242 प्रवासी होते. हे विमान लांबपल्ल्याचे असल्याने आधुनिक होते. त्यात इंधन कमी लागत होते. अनेक सुविधा या विमानात होत्या. एअर इंडियाकडे या प्रकारची 29 ड्रीमलायनर विमाने आहेत. टाटाने एअर इंडियाला टेकओव्हर केल्यानंतर आणखी 20 विमानांची ऑर्डर दिलेली होते. गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (SVPIA) येथील उड्डाणे तात्पुरती UTC 12:00 ( सायं. 5:30 IST ) पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
एअर इंडिया AI 171 विमान अपघातातील परिस्थिती हाताळण्यात सर्व युनिट्स जबाबदार असल्याने विमानतळ बचाव आणि अग्निशमन सेवा ( RFFS ) देऊ शकत नसल्याने विमानतळाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान होते, ज्या 242 प्रवासी प्रवास करीत होते. 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स, ज्यात 2 पायलट असे 242 प्रवासी प्रवास करीत होते.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.