
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. कोसळलेलं AI171 हे विमान एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचं होतं. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत हे विमान कोसळलं. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 242 प्रवासी होते. अहमदाबादहून हे विमान लंडनला जात होते. दरम्यान, हे विमान कोसळल्यानंतर या दुर्घटनेचा एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 242 प्रवासी होते. हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला जाणार होते. या विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून उड्डाण घेतले होते. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला हे विमान थेट जमिनीवर आदळले. हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या भागात घरे आहेत. विमान कोसळल्यानंतर त्याला लगेच आग लागली.
Air India Dreamliner crash flight AI171
A sad day for aviation @AirNavRadar
— Flight Emergency (@FlightEmergency) June 12, 2025
या विमानाला दुर्घटना झाल्यानंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये धुराचे मोठे लोट दिसत आहेत. म्हणजचे अपघातानंतर या विमानाला लगेच आग लागली आहे. या विमानात 242 प्रवासी होते. अपघातग्रस्त विमानाचे नाव AI171 असे असून या अपघातात काही जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना घडताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. तसेच या दुर्घटनेत बचावकार्य करण्यासाठी केंद्र सरकाकडून पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन अमित शाहा यांनी दिले आहे.
Air India Plane crashes in Ahemdabad
Plane has crashed in Gujarat’s Meghani Nagar. The site where the plane crashed is believed to be a residential area. All roads to the area have been closed. Likely to be a passenger plane
Details awaited pic.twitter.com/2Jqr257aLL
— Nabila Jamal (@nabilajamal_) June 12, 2025
विमान कोसळल्यानंतर एअर इंडियाने अधिकृतपणे माहिती दिली आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार AI171 हे विमान अहमदाबादहून-लंडनमधील गॅटविक येथे जात होते. या विमानाचा अपघात झाला आहे. सध्या या घडीला आम्ही या अपघाताविषयी अधिक माहिती घेत आहोत. हा अपघात कसा झाला? त्यामागची कारणं काय? याची माहिती आम्ही लवकरच देऊ, असं एअर इंडियाने सांगितलं आहे. सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार विमानाच्या पाठीमागचा भाग हा झाडाला अडकला होता, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असं सांगण्यात येतंय.