
अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया कंपनीचे प्रवासी वाहतूक करणारे विमान टेक ऑफ नंतर लगेचच कोसळले. 12 जून रोजी घडलेल्या या घटनेत एकूण 270 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर गेल्या काही दिवसांत तांत्रिक बिघाड आणि सुरक्षेच्या कारणास्तव बोईंग विमानांना लँडींग करावी लागल्याच्या काही घटना घडल्या आहे. आता अमेरिकेवरुन मुंबईत येणाऱ्या विमानाचे कोलकातामध्ये लँडींग झाले. त्या ठिकाणी विमानास हॉल्ट होता. परंतु तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे प्रवाशांना मुंबई ऐवजी कोलकाता येथेच उतरवण्यात आले.
अहमदाबाद विमान अपघातानंतर हाँगकाँगवरुन दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणादरम्यान मध्येच उतरवावे लागले होते. आता अमेरिकेवरुन मुंबईला येणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोलकाताला थांबवण्यात आले. अमेरिकेतील सॅन फ्रॉसिस्कोवरुन कोलकाता मार्गाने हे विमान मुंबईत येणार होते. परंतु इंजिनात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे मंगळवारी सकाळी कोलकोता विमानतळावर प्रवाशांना उतरवण्यात आले.
विमान AI 180 कोलकाता विमानतळावर मध्यरात्री 00.45 वाजता पोहचले. परंतु इंजिनातील बिघाडामुळे मुंबईकडे टेकऑफ घेऊ शकले नाही. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना सकाळी 05.20 उतरण्याचे सांगण्यात आले. विमानाचे पायलट यांनी सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेत असल्याचे प्रवाशांना सांगितले.
VIDEO | Kolkata: An Air India flight from San Francisco to Mumbai via Kolkata suffered a technical snag in one of its engines, requiring passengers to be deplaned during a scheduled halt at the city airport early on Tuesday.
Flight AI180 arrived on time at the city airport at… pic.twitter.com/0MSUiiwPdZ
— Press Trust of India (@PTI_News) June 17, 2025
हाँगकाँगवरुन दिल्लीला येणारे विमान तांत्रिक बिघाडानंतर पुन्हा हाँगकाँगला नेण्यात आले होते. तसेच ब्रिटीश एअरवेजच्या ड्रिमलायनर विमानातही रविवारी तांत्रिक बिघाड आल्याचे समोर आले होते. टेकऑफनंतर अवघ्या दोन तासांतच हिथ्रो विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले. चेन्नई जाणारे हे विमान होते. तसेच फ्रँकफर्टहून हैदराबादला येणारे लुफ्थांसाचे विमान बॉम्बच्या धमकीमुळे जर्मनीला परत पाठवावे लागले. ही दोन्ही विमाने देखील बोईंग ड्रिमलाइनर होती. अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानात बिघाडाचे कोणतेही अलर्ट आले तरी विमान कंपन्या त्वरीत अलर्ट होत आहे. गेल्या काही दिवसांतील सततच्या घटनांनंतर प्रवाशांमध्ये बोईंग विमानांबद्दल अस्वस्थता दिसून येत आहे.