AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीमध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार अयशस्वी, धोकादायक पातळीपेक्षा नऊ पट जास्त

2018 पासून वायू प्रदूषाणाविरूद्ध लढण्यासाठी एयर फिल्टरींग (air filtering) प्रक्लपासाठी तब्बल 76 कोटी रूपये केंद्र सरकारे भारतभरात दिले ज्यामधला जास्त हिस्सा हा दिल्लीला देण्यात आला होता. ऑक्टोबर 2021 महिन्यात सुद्धा PM 2.5 लेव्हल धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहेत.

दिल्लीमध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार अयशस्वी, धोकादायक पातळीपेक्षा नऊ पट जास्त
देशातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये यूपीतील आठ शहरांचा समावेश
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 9:14 PM
Share

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत प्रदूषणात कमालीची वाढ झालीय. 2018 पासून वायू प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी एअर फिल्टरिंग (air filtering)साठी तब्बल 76 कोटी रुपये केंद्र सरकारने भारतभरात दिलेत. या निधीतला जास्त हिस्सा हा दिल्ली राज्यासाठी देण्यात आला होता. मात्र आजमितीस यातील किती रक्कम वापरली याबाबत सरकारनं काहीही ठोस पुरावे दिलेले नाहीत. ऑक्टोबर 2021 महिन्यातसुद्धा PM (particulate matter in air) ची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहेत. भारतभरात दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त आहे आणि सरकार या संकटाविरोधात मार्ग काढण्यात अयशस्वी ठरत आहे. (air pollution in delhi at dangerous levels government failure)

“वायू” प्रकल्प

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते 2018 मध्ये (Wind Augmentation Purifying Unit)- “वायू” या प्रकल्पाअंतर्गत बाह्य प्रदूषण नियंत्रण (Outdoor Pollution Control) प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. मात्र अनेक तज्ज्ञांकडून या हवा शुद्धीकरण प्रकल्पाला नामंजुरी देण्यात आली आणि त्याला भव्य व्हॉक्यूम क्लीनर्सशी (large vaccum cleaners) तुलना करण्यात आली.

केंद्र सरकारने नेमकं प्रोजेक्टबद्दल काय सांगितले?

वायू प्रोजेक्ट हा निरी (NEERI) आणि आयआयटी मुंबईने तयार केला आहे आणि हे फिल्टर्स वायू प्रदूषणातील धोकादायक कार्बन मोनो ऑक्साईड PM 2.5 आणि PM 10 ला कार्बन डाय ऑक्साईडमध्ये रूपांतरीत करते, ज्याने ट्रॅफिक जंक्शनवरील प्रदूषण 40 ते 60 टक्क्यांनी कमी होईल. यासाठी 36 कोटी दिले होते असे वृत्त आहे.

दिल्लीमधले एअर प्युरिफायर

यानंतर जानेवारी 2020 मध्ये पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी त्यांच्या फाऊंडेश द्वारे लाजपत नगर मार्केटमध्ये एक भव्य एअर प्युरिफायर लावले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक एअर प्युरिफायर लावले. हे प्युरिफाअर्स त्या भागात 1000 स्क्वेअर मीटर परिसरात  1 लाख क्युबिक मीटर शुद्ध वायू देईल, असं त्यांनी सांगितलं होतं. यासारखे भव्य एअर प्युरिफायर्स दिल्लीच्या कॅनोट प्लेस आणि आनंद विहारमध्ये देखील बसवलेले आहेत. मात्र हे प्रक्लप वायू प्रदूषणाविरोधात किती प्रभावी आहेत, यासाठी संशोधक आणि तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केलेत.

PM 2.5 ची पातळी नऊ पट जास्त

दिल्लीत 2020 मध्ये PM 2.5 ची पातळी साधारण पातळीपेक्षा नऊ पट जास्त नोंद झाली. ह्या वायूच्या कणांमुळे श्वास आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते. तर PM 10 हे धोकादायक वायूचे कण धुळीमुळे निर्माण होतो.

दिल्लीत प्रदूषणाचं मुख्य कारणे

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हरयाणामध्ये शेतीचा कचरा जाळण्यामुळे दिल्लीत प्रदूषण वाढते, असं म्हटले जाते. पण दिल्लीत प्रदूषणाचं मुख्य कारणे हे वाढत असलेल्या गाड्या, वीज निर्मितीसारखे जड उद्द्योग, वीट भट्ट्यांसारखे लघु उद्द्योग, सतत चालत असलेले बांधकाम उद्द्योग, उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा इत्यादी आहेत. ऑक्टोबर 2021 महिन्यात सुद्धा PM ची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहेत. भारतभरात दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त आहे आणि सरकार या संकटाविरोधात मार्ग काढण्यात अयशस्वी आहे.

इतर बातम्या

Weather Forecast : परतीचा पाऊस 26 ऑक्टोबरपासून पुन्हा बरसणार, शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

Jammu Kashmir Poonch encounter : पुंछमध्ये गोळीबार सुरुच, 13 वर्षानंतर सर्वाधिक काळ सर्च ऑपरेशन, अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी सैन्यदलाचं प्लॅनिंग

Covid Updates: भारतात तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का?

(air pollution in delhi at dangerous levels government failure)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.