
अतिरेकी हाफिज सईज याचा गड मानला जाणाऱ्या मुदिरके येथे ७ मे रोजी झालेल्या भारताच्या एअर स्ट्राईक संदर्भात मोठी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अल-जजीराच्या बातमीनुसार या मुरिदकेच्या मदरशात जर काही मिनिटांच्या आधी भारताचा एअर स्ट्राईक झाला असता तर एकाच वेळी लष्करचे ३००० अतिरेकी एकाच जागीच ठार झाले असते. एक मिनिटांच्या विलंबनाने बहुतांशी अतिरेकी वाचल्याचे अल-जजीराने म्हटले आहे. पाकिस्तानात मुरिदके प्रांत लष्कर -ए-तैयबाचा गड म्हटला जातो. येथेच लष्करच्या अतिरेक्यानां प्रशिक्षण दिले जाते.येथून प्रशिक्षित झालेल्या अतिरेकी आंतक वाद पसरविण्यासाठी कश्मीरच्या दिसेने दिसतो.
अल-जजीरा च्या मते मुरिदके परिसरात हाफीज सईचा एक मदरसा आहे. एक आरोग्य केंद्र आणि मस्जिदची निर्मिती केली आहे. याशिवाय याच मुरिदकेत एका कॉलनीची उभारणी केली आहे. येथे पाकिस्तान सरकारचे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना येथे ठेवले जाते. सुमारे ३०० कुटुंबं या इलाक्यात रहात आहेत. मुरिदके येथे एका मदरसा असून त्यात ३००० हुन अधिक मुलांना शिकवले जाते. या मुलांना सकाळी फिजिकल ट्रेंनिग दिली जाते. यानंतर जिहादचा अर्थ सांगितले जात आहे. मदरशात राहणारे एक मौलाना यांनी अल-जजीरा सांगितले की येथे तीन दशकांहून अधिक काळ मुलांचे शिक्षण दिले जाते. मौलानाने हाफीजच्या मदरशात अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप खोडून काढला आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर येथील लोकात दहशत पसरली होती. लोक हळूहळू येथून मुव्ह करु मदरशातून बाहेर पडू लागले.जे जाऊ इच्छीत नव्हेत त्यांनाही पाकिस्तानी सरकार आणि लष्करशी जोडलेल्या लोकांना जबरदस्ती पाठवणे सुरु केले.असे म्हटले जात आह की जर भारताने थोडा आधी येथे एअर स्ट्राईक केला असता तर लश्करच्या अड्डयातच ३००० अतिरेकी ठार झाले. भारताच्या स्टाईकनंतर आता येथे हडकंप वाढला आहे. बहावलपुरनंतर येथे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानी सरकारने आतापर्यंत मृतांचा आकडा सांगितलेला नाही. परंतू भारताच्या स्ट्राईक नंतर येते १०० हून अधिक अतिरेकी ठार झाल्याचे म्हटले जात आहे.