AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोभाल यांचा पहिला चीन दौरा, पाकिस्तानला देणार कठोर संदेश

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात आणि चीनकडून पाकिस्तानला मिळत असलेल्या लष्करी पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर अजित डोभाल चीनमध्ये जात आहे. शंघाई शिखर परिषदेत पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा निषेधाचा ठराव करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोभाल यांचा पहिला चीन दौरा, पाकिस्तानला देणार कठोर संदेश
Ajit DovalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2025 | 9:52 AM
Share

Ajit Doval China visit : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल लवकरच चीन दौऱ्यावर जाणार आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोभाल हा पहिला चीन दौरा करणार आहे. अजित डोभाल या दौऱ्यात दहशतवाद्यावर कठोर संदेश देणार आहेत. या दौऱ्यात भारत आणि चीन यांचे संबंध अधिक चांगले करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. अजित डोभाल यांचा हा दौरा शंघाई शिखर संघटन (SCO) सम्मेलनामुळे होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही समिट चीनमध्ये होणार आहे.

चीनसोबत अनेक मुद्यांवर चर्चा

अजित डोभाल चीनमध्ये त्यांच्या समकक्षांना भेटतील. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. तसेच डोभाल दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा संदेश देतील. दहशतवाद्यांना दिली जाणारी मदत थांबवण्याबाबत ते बोलतील. दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा होऊ शकते. चीनने भारताला थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने चीनलाही कडक संदेश दिला होता. हा संदेश सीमापार दहशतवाद आणि पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल होता. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात आणि चीनकडून पाकिस्तानला मिळत असलेल्या लष्करी पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.

डोभाल- वांग यी यांची भेट होणार का?

इस्त्रायल आणि इराण युद्ध सुरु असताना अजित डोभाल चीन दौऱ्यावर जात आहे. इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चीनमध्ये होणाऱ्या शंघाई सहयोग संगटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होणार की नाही? हे अजून निश्चित नाही. डोभाल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वांग यी हे विशेष प्रतिनिधी देखील आहेत.

डोभाल यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर वांग यी यांच्याशी त्वरित चर्चा केली होती. तसेच वांग यी लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याच्या बातम्या आहेत. शंघाई शिखर परिषदेत पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याचा ठराव संमत करण्यासाठीही भारत प्रयत्न करणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.