अंबानी अँटिलिया स्फोटक प्रकरण: CCTV फुटेज सादर करण्यासाठी सचिन वाझेचा न्यायालयात अर्ज
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टात अँटिलिया परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

सचिन वाझे याने जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान अँटिलिया निवासस्थान येथील अलटामाऊंट रोडवरील CCTV फुटेज न्यायालयात सादर करण्याची मागणी केली याचिकेद्वारे केली आहे. यासाठी विशेष NIA न्यायालयात CrPC कलम 294 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पुरावे रेकॉर्डवर घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजीचे विजय स्टोअर्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पेनड्राइव्हद्वारे सादर करण्याची मागणी त्याने या याचिकेच्या द्वारे केले आहे.
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टात अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ ठेवण्याच्या प्रकरणात त्याच्यावरील आरोपांवरुन याचिका केली आहे. या प्रकरणात त्याने अलटामाऊंट रोडवरील CCTV फुटेज न्यायालयात सादर करण्याची मागणी केली याचिकेद्वारे केली आहे.शिखर कुंज इमारतीबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ आणि जवळून जाणारी इनोव्हा या वाहनांचे फुटेज महत्त्वाचे असल्याचा दावा त्याने केला आहे. इनोव्हा वाहन काही क्षण स्कॉर्पिओपासून आठ ते दहा फूट अंतरावर थांबल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे अर्जात नमूद केले आहे.
या दृश्यांमुळे साक्षीदाराच्या CrPC कलम 164 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबातील दाव्यांना विरोधाभास निर्माण होत असल्याचा दावा सचिन वाझे यांनी दावा केला आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्टोअरकीपरने स्कॉर्पिओचा चालक बाहेर येताना किंवा निघून जाताना दिसला नसल्याचे सांगितल्याचा उल्लेख आहे. विजय स्टोअर्सचा DVR 26 फेब्रुवारी 2021 रोजी गावदेवी पोलिसांनी जप्त केला होता, मात्र त्यातील माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली नसल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. कथित KW1 चे स्कॉर्पिओ आणि इनोव्हा वाहनांवरील ठसे, DNA नमुने किंवा CCTV फुटेजमधील उपस्थितीबाबत पुरावे नसल्याचा दावा सचिन वाझे याने केला आहे. न्यायाच्या हितासाठी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे विशेष NIA न्यायालयातील खटल्याच्या रेकॉर्डवर घेण्याची मागणी सचिन वाझे यांनी केला आहे.