भारतासमोर अमेरिकेचा तोरा टीकला नाही, जीईने तिसरे इंजिन पाठवले, तेजस उड्डाण घेणार

टॅरिफवरुन वारंवार भारताला डीवचण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता थंड पडले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेच्या जीई कंपनीने भारताला अखेर इंजिन देण्यास सुरुवात केली आहे.

भारतासमोर अमेरिकेचा तोरा टीकला नाही, जीईने तिसरे इंजिन पाठवले, तेजस उड्डाण घेणार
Tejas LCA
| Updated on: Sep 11, 2025 | 4:20 PM

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताविरोधात धोरणाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या हेकेखोरपणा कमी झाल्यानंतर अमेरिकन कंपनी जीईने HAL ला तिसरे एव्हीएशन इंजिन (F-404) डिलिव्हरी दिली आहे. तसेच चौथे इंजिनही लागलीच या महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेला ( ऑगस्ट ) एकाही इंजिनाचा पुरवठा झालेला नव्हता. त्यावेळी भारत आणि अमेरिकेचे संबंध टॅरिफनंतर कमालीचे ताणलेले होते. या डीलनुसार या वर्षी (2025-26) GE कडून हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला एकूण 99 पैकी 12 इंजिन मिळणार आहेत. या इंजिनाच्या वापराने LCA-तेजस फायटर जेटची अद्यायावत आवृत्ती एलसीए मार्क-1 एच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. अमेरिकेकडून या इंजिनाच्या डिलिव्हरीला दोन वर्षांचा उशीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन (31 ऑगस्ट -1 सप्टेंबर) दौऱ्यानंतर बुधवारी (10 सप्टेंबर 2025) तिसऱ्यांदा ट्रम्प यांनी भारताची स्तुती केली आङे. ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारत आणि अमेरिका खूप चांगले मित्र आणि स्वाभाविक भागीदार आहेत. ऑपरेशन सिंदूर यांच्यात ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या वक्तव्यानंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधात कटूता आली होती.

ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी असे म्हणत 50 टक्के टॅरिफ लावला होता. परंतू भारताच्या कुटनितीपुढे ट्रम्प यांना झुकावे लागले आणि मोदींची भेट घ्यायची आहे असे ट्रम्प यांना म्हणावे लागले. अमेरिकेकडून एव्हीएशन इंजिन पुरवठ्यात होत असलेल्या उशीरानंतरही हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय वायुसेनेला एलसीए तेजस फायटर जेटच्या दोन एडव्हान्स व्हर्जन मार्क-1ए ची डिलिव्हरी करणार आहे.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड मार्क-1 ए दहा व्हर्जन बनवल्या

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड मार्क-1 ए दहा व्हर्जन बनवल्या आहेत. परंतू अमेरिकन कंपनी जीईने F-404 इंजिनच्या पुरवठ्यात लागोपाठ चालढकल चालवली आहे. अशात LCA मार्क-1 ए प्रोजेक्ट खूपच रेंगाळला आहे. या संदर्भात वायूसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी.सिंह यांनी सार्वजनिकपणे आपली नाराजी जाहीर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आता या महिन्यात ( सप्टेंबर ) LCA मार्क-1ए चे फायरिंग चाचणी आहे. या दरम्यान स्वदेशी लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) ते स्वदेशी अस्त्रा (बियॉन्ड व्ह्युजअल रेंज) मिसाईल आणि शॉर्ट रेंज एअर टू एअर मिसाईल चाचणी होणार आहे.

या चाचण्यांनंतर भारतीय वायूसेनेला दोन एलसीए विमान सोपवले जाणार आहेत. LCA मार्क-1ए निर्मितीसाठी भलेही अमेरिकेकडून एव्हीएशन इंजिन पुरवठा सुस्तगतीने सुरु असला तरी गेल्या महिन्यात वायूसेनेसाठी अतिरिक्त 97 स्वदेशी लढाऊ विमानांच्या खरेदी मंजूरी दिलेली आहे.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचा वायुसेनेशी करार

साल 2021 मध्ये संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडशी वायूसेनेसाठी 83 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क-ए साठी करार केला होता. हा करार 48 हजार कोटी रुपयांचा होता. या LCA विमानांसाठी भारताने अमेरिकन GE कंपनीशी 99 F-404 एव्हीएशन इंजिन खरेदीचा करार केला होता. गेल्या दोन वर्षांपासून जीई कंपनी इंजिन पाठवत नसल्याने गोंधळ उडाला आहे. आतापर्यंत केवळ दोन इंजिनांचा पुरवठा जीई कंपनीने केला आहे. जागतिक साखळी पुरवठा बाधित झाल्याने हे इंजिन मिळाली नसल्याचा दावा अमेरिकेने केला होता. परंतू आधी खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा प्रयत्नाचा कट रचण्याचा आरोप आणि आता टॅरिफ वॉर ( ऑपरेशन सिंदूर ) आदी कारणाने हा पुरवठा धीम्या गतीने होत आहे.

LCA प्रोजेक्टचा आढावा

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडनने दावा केला आहे की या वर्षी (मार्च 2026)पर्यंत 10 लढाऊ विमानांचा पुरवठा होऊ शकतो. जुलै महिन्यात पंतप्रधान कार्यालय ( PMO) चे प्रिन्सिपल सेक्रेटरी पी.के.मिश्रा यांनी स्वत: HAL च्या बंगुळुरु कारखान्यात जाऊन LCA प्रोजेक्टचा आढावा घेतला होता.