तेलाच्या संकटात केंद्र सरकारने थेट घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट सवलत..

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना पूर्ण झाला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. उलट युद्ध अधिक भडकण्याचे मोठे संकेत आहेत. यादरम्यानच भारत सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला.

तेलाच्या संकटात केंद्र सरकारने थेट घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट सवलत..
Indian government
| Updated on: Apr 02, 2026 | 12:22 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जग संकटात आहे. युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच युद्ध अधिक भडकण्याचे संकेत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांनी युद्ध अधिक भडकणार असल्याचे म्हटल्याने जग तणावात आहे. जागतिक बाजारात तेलाच किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. या युद्धाच्या काळात आता केंद्र सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले. युद्धाची भारताला झळ बसू नये, याकरिता केंद्र सरकारकडून विविध पाऊले उचलले जात आहेत. केंद्र सरकारने आता नुकताच खत कंपन्यांना मोठा दिलासा दिला. सरकारने अमोनियम नायट्रेटवरील आयात शुल्क माफ करण्याची घोषणा केली. अनेक पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्कदेखील माफ करण्यात आले आहे. आता ही सूट आजपासून लागू करण्यात आली. 2 एप्रिल ते 30 जूनपर्यंत ही सूट देण्यात आली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा दिला मिळणार आहे.

सरकारने मोठा निर्णय घेत थेट अत्यावश्यक कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर आणली. खत आणि रासायिक उद्योगांना थेटपणे दिला दिला. युद्धादरम्यान पुरवठ्यावरील निर्बंधामळे अडचण वाढली होती. खर्चाचा दबाव वाढत असतानाच सरकारकडून हा दिलासा देण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला.

खत उत्पादनासाठी अमोनियम नायट्रेटसारखी रसायने आवश्यक आहेत. अमोनियम नायट्रेटवरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर देखील हटवण्यात आला आहे, ज्यामुळे खत क्षेत्राला अतिरिक्त लाभ मिळत आहे. त्याचा थेटपणे फायदा होणार आहे. मात्र, ही दिलेली सूट काही काळाकरिताच असणार आहे.

इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान सरकारकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. या युद्धाचा भारताला नक्कीच फटका बसला आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. होर्मुज खाडीतून भारताचे जहाज कसे काढता येतील, यावर सतत चर्चा केल्या जात आहेत. होर्मुज खाडीतून भारताचे जहाज सोडले जात आहेत. मात्र, अजूनही जहाज तिथे अडकले आहेत. त्यामध्येच युद्ध अधिक घातक होण्याचे संकेत आहेत. यामुळे पुढील काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

Follow Us