AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raghav Chadha : परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढाला आम आदमी पार्टीने दिला मोठा झटका

Raghav Chadha : राघव चड्ढा हे राज्यसभेत खासदार आहेत. ते अभिनेत्री परिणिती चोप्राचे पती आहेत. राघव चड्ढा हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडून राज्यसभेवर गेले आहेत.त्यांना आता पक्षाने मोठा धक्का दिला आहे.

Raghav Chadha : परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढाला आम आदमी पार्टीने दिला मोठा झटका
Parineeti Chopra husband raghav chadha
| Updated on: Apr 02, 2026 | 2:09 PM
Share

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना मोठा झटका दिला आहे. आम आदमी पार्टीने मोठा फेरबदल केला आहे. खासदार राघव चड्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरुन हटवलं आहे. आता राघव चड्ढा यांच्या जागी लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटीचे चांसलर आणि पक्षाचे खासदार डॉ.अशोक कुमार मित्तल राज्यसभेत पक्षाचे नवीन डेप्युटी लीडर असतील. आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांच्यासंबंधी राज्यसभा सचिवालयाला एक पत्र पाठवलं आहे. राघव चड्ढा यांच्यासंदर्भात याआधी सुद्धा अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. राघव चड्ढा यांनी मागच्या काही दिवसांपासून AAP आणि त्यांच्या टॉप लीडर्सशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवर मौन धारण केलं होतं. आता पक्षाने राघव चड्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरुन हटवलं आहे. राघव चड्ढा अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती आहेत.

राघव चड्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरुन हटवणं हा आम आदमी पार्टीमध्ये एक मोठा बदल म्हणून पाहिलं जात आहे. अलीकडेच आबकारी नीति प्रकरणात पक्षाच्या टॉप नेत्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर राघव चड्ढा यांची अरविंद केजरीवाल यांच्यासोबत कुठलीही भेट झाली नाही किंवा त्यांनी सोशल मीडियावर या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी धारण केलेल्या या मौनाकडे ते पक्षापासून लांब जात असल्याचे संकेत म्हणून पाहिलं जात होतं.

डॉ.अशोक कुमार मित्तल कोण?

नवीन डेप्युटी लीडर डॉ.अशोक कुमार मित्तल आपचे एक अनुभवी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित खासदार आहेत. त्यानंतर वर्ष 2022 मध्ये पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आलय. संसदेच्या मागच्या सत्रात त्यांनी कृषी आणि शिक्षणाशी संबंधित मुद्यांवर प्रखरतेने आपली मतं मांडली होती. अशोक मित्तल त्यांच्या शांत आणि तार्किक कार्यशैलीमुळे वरच्या सभागृहात पक्षाचा अजेंडा किती प्रभावीपणे मांडतात ते लवकरच कळेल.

Follow Us
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.