AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळसूबाई ते गिरनार…; अवघ्या पावणे तीन वर्षांच्या चिमुरड्याने रचला इतिहास, महाराष्ट्राच्या छोट्या मावळ्याचा पराक्रम

मावळच्या ३ वर्षीय रायाजी घारेने ५० गड-किल्ले सर करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे. कळसूबाई आणि साल्हेर सारखी शिखरे सर करणाऱ्या या चिमुकल्या मावळ्याची प्रेरणादायी कहाणी.

| Updated on: Apr 02, 2026 | 1:57 PM
Share
जिद्द, धाडस आणि अचाट इच्छाशक्तीच्या जोरावर मावळ तालुक्यातील ओझर्डे येथील अवघ्या पावणे तीन वर्षांच्या रायाजी सुधीर घारे याने महाराष्ट्राच्या गिरीरोहण क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.

जिद्द, धाडस आणि अचाट इच्छाशक्तीच्या जोरावर मावळ तालुक्यातील ओझर्डे येथील अवघ्या पावणे तीन वर्षांच्या रायाजी सुधीर घारे याने महाराष्ट्राच्या गिरीरोहण क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.

1 / 8
रायजीने आतापर्यंत तब्बल ५० गड-किल्ले सर केले आहेत. त्यामुळे रायाजीची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये सर्वात लहान गिरीरोहक म्हणून नोंद झाली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रायजीने आतापर्यंत तब्बल ५० गड-किल्ले सर केले आहेत. त्यामुळे रायाजीची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये सर्वात लहान गिरीरोहक म्हणून नोंद झाली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

2 / 8
रायाजीने आपल्या मोहिमेदरम्यान विलक्षण चपळता दाखवली आहे. त्याने अवघ्या ४० दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरातमधील अत्यंत कठीण मानली जाणारी तीन सर्वोच्च शिखरे सर केली.

रायाजीने आपल्या मोहिमेदरम्यान विलक्षण चपळता दाखवली आहे. त्याने अवघ्या ४० दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरातमधील अत्यंत कठीण मानली जाणारी तीन सर्वोच्च शिखरे सर केली.

3 / 8
११ जानेवारी २०२४ रोजी त्याने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई (५,४०० फूट) अवघ्या ४ तास २० मिनिटांत सर केले. त्यानंतर २७ जानेवारीला साल्हेर किल्ला (५,१५७ फूट) आणि २ मार्च २०२४ रोजी गुजरातमधील गिरनार शिखर (३,६६६ फूट) ५ तास १ मिनिटांत सर करून सर्वांना अचंबित केले.

4 / 8
रायाजीच्या या साहसी प्रवासाची सुरुवात वयाच्या १ वर्षे ८ महिन्यांपासूनच झाली होती. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याने 'दुर्गराज रायगड' सर करून आपली पहिली मोहीम फत्ते केली.

रायाजीच्या या साहसी प्रवासाची सुरुवात वयाच्या १ वर्षे ८ महिन्यांपासूनच झाली होती. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याने 'दुर्गराज रायगड' सर करून आपली पहिली मोहीम फत्ते केली.

5 / 8
वडील सुधीर घारे, आई प्रिया आणि बहीण श्रीजा यांच्या सोबतीने त्याने ही दुर्गभ्रमंती सुरू ठेवली आहे. गड-किल्ल्यांच्या ओढीमुळे हा चिमुकला आता महाराष्ट्रातील गड वेड्यांसाठी एक प्रेरणास्थान बनला आहे.

वडील सुधीर घारे, आई प्रिया आणि बहीण श्रीजा यांच्या सोबतीने त्याने ही दुर्गभ्रमंती सुरू ठेवली आहे. गड-किल्ल्यांच्या ओढीमुळे हा चिमुकला आता महाराष्ट्रातील गड वेड्यांसाठी एक प्रेरणास्थान बनला आहे.

6 / 8
रायाजीच्या कळसूबाई आणि साल्हेर मोहिमेची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली आहे. दरम्यान, गिरनार मोहिमेची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती त्याचे वडील सुधीर घारे यांनी दिली.

7 / 8
रायाजीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ३५० हून अधिक किल्ले पाहावेत, हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही त्याच्या वडिलांनी नमूद केले.

रायाजीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ३५० हून अधिक किल्ले पाहावेत, हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही त्याच्या वडिलांनी नमूद केले.

8 / 8
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...