AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाराणसीतून सुरु होणार २ अमृत भारत ट्रेन, युपी-महाराष्ट्राची कनेक्टिव्हीटी होणार सुपरफास्ट

रेल्वे प्रवाशांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून दोन नव्या अमृत भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्र ते वाराणसी कनेक्टीव्हीटी चांगली वाढणार आहे.

वाराणसीतून सुरु होणार २ अमृत भारत ट्रेन, युपी-महाराष्ट्राची कनेक्टिव्हीटी होणार सुपरफास्ट
amrit bharat trains
| Updated on: Apr 24, 2026 | 3:54 PM
Share

रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. येत्या २८ एप्रिलपासून वाराणसीतून दोन नवीन अमृत भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोपा आणि स्वस्त होणार आहे. या दोन ट्रेन सुरु झाल्यानंतर लांबचा प्रवास करणारे प्रवासी आणि धार्मिक पर्यटन करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ एप्रिल रोजी या दोन नवीन अमृत भारत ट्रेना हिरव्या झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.

या दोन मार्गांवर धावणार नवीन ट्रेन

यातील पहिली ट्रेन वाराणसी ( बनारस ) ते हडपसर ( पुणे ) दरम्यान चालविली जाणार असून या ट्रेनचा क्रमांक 22589/22590 असा आहे. ही ट्रेन प्रयागराज, झाँसी, इटारसी आणि भुसावळ सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबा घेणार आहे. या मार्गाचा प्रवासाचा वेळ सुमारे २८ ते ३० तास असा असणार आहे. दुसरी ट्रेन अयोध्या ते मुंबई दरण्यान चालविली जाणार आहे. ही ट्रेन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून मुंबईत पोहचणार आहे.या ट्रेनमुळे उत्तर भारत आणि आर्थिक राजधानी मुंबईची कनेक्टिव्ही आणखी मजबूत होणार आहे..

प्रवाशांना मिळणार खास सुविधा –

अमृत भारत ट्रेन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत. यात पुश-पुल तंत्राचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे ट्रेनचा वेग आणि परऑर्मेन्स चांगला असेल . या ट्रेनमध्ये नॉन-एसी कोच असणार आहे. ज्यात बहुतांशी स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्तात प्रवास करण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय आरामदायक सीटींग आणि इतर आवश्यक सुविधा देखील मिळणार आहेत.

कोणत्या लोकांना जास्त फायदा –

या ट्रेनचा फायदा खासकरुन धार्मिक पर्यटन करणाऱ्या प्रवाशांना आणि लांबपल्ल्याच्या प्रवाशांना होणार आहे. अयोध्या आणि वाराणसी सारख्या शहरांना मुंबई सारख्या शहराला जोडल्याने धार्मिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रवास सोपे होणार आहेत.

प्रवास स्वस्त आणि वेळेची बचत –

नवीन ट्रेन सुरु झाल्याने प्रवाशांना थेट कनेक्टिव्हीटी मिळेल, ज्यामुळे वारंवार ट्रेन बदलण्याची गरज राहणार नाही. यामुळे न केवळ वेळेची बचत होईल. शिवाय प्रवास खूप स्वस्तात होईल. सरकारचे हे पाऊल देशाच्या रेल्वे नेटवर्कला मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठा प्रयत्न मानला जात आहे. युपी आणि महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात चांगल्या कनेक्टिव्हीटीमुळे व्यापार, पर्यटन आणि सर्वसामान्य लोकांना प्रवास करणे सोपे होणार आहे.

Follow Us
धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; ठाकरेंचा मोठा दावा
मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर...
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...
आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले