अनंत अंबानींचा दानशूरपणा; रामनवमीला मंदिरात दान केले तब्बल इतके कोटी रुपये

| Updated on: Apr 18, 2024 | 11:37 AM

रामनवमीनिमित्त अनंत अंबानी यांचा दानशूरपणा पहायला मिळाला. देशातील दोन मोठ्या मंदिरात त्यांनी मोठी रक्कम दान केली. अंबानी कुटुंबीयांनी याआधीही विविध मंदिरांमध्ये दान केलंय. रामनवमीनिमित्त अनंत अंबानी हे या दोन मोठ्या मंदिरात दर्शनासाठीही गेले होते.

अनंत अंबानींचा दानशूरपणा; रामनवमीला मंदिरात दान केले तब्बल इतके कोटी रुपये
Anant Ambani and Radhika Merchant
Image Credit source: Instagram
Follow us on

बुधवारी 17 एप्रिल रोजी देशभरात रामनवमी जल्लोषात साजरी करण्यात आली. रामनवमीनिमित्त रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा दानशूरपणा पहायला मिळाला. अनंतने देशातील दोन मोठ्या मंदिरांमध्ये मोठी रक्कम दान केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक होत आहे. दोन्ही मंदिरांमध्ये त्याने रामनवमीच्या दिवशी तब्बल पाच कोटी रुपयांचं दान केलं आहे. पापाराझी विरल भयानीच्या पोस्टनुसार आणि ‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार अनंत अंबानी यांनी पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात 2.51 कोटी रुपये दान केले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा झेड प्लस सुरक्षेसह ते जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते.

जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनंत अंबानी आसामला रवाना झाले. तिथे त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. कामाख्या देवीच्या मंदिरातही त्यांनी 2.51 कोटी रुपये दान केले. या दान केलेल्या रकमेबद्दल अंबानींकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांचं नेटकरी कौतुक करत आहेत. अंबानी कुटुंबीयांकडून अशा पद्धतीने मोठी रक्कम दान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक मंदिरांमध्ये दान केलंय.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी यांनी केदारनाथ-बद्रीनाथ मंदिरात पाच कोटी रुपये दान केले होते. यानंतर अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 कोटी कोटी रुपये दिले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये अनंत यांनीच चार धाम देवस्थान मॅनेजमेंट बोर्डाला पाच कोटी रुपये दान केले होते. कोरोना काळात त्यांनी ही मदत केली होती. दान पुण्याशिवाय अनंत अंबानी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळेही चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात जामनगरमध्ये अंबानींकडून मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केवळ देशातीलच नव्हे तर परदेशाहूनही नामवंत सेलिब्रिटी उपस्थित होते.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगची देशभरात जोरदार चर्चा होती. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला तारे-तारकांची मांदियाळी होती. बॉलिवूडच नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केलं होतं. जामनगरमध्ये त्या तीन दिवसात जवळपास 350 विमामांनी ये-जा केली होती. उद्योग जगतातून अदानींपासून पीरामल आणि बिर्लांपासून टाटांपर्यंत प्रत्येक दिग्गज बिझनेस घराणी उपस्थित होती.