plane crash : मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भीषण अपघात, बेळगावला निघालेलं विमान शेतात कोसळलं

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका विमानाचा अपघात झाला आहे.

plane crash : मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भीषण अपघात, बेळगावला निघालेलं विमान शेतात कोसळलं
Belgaum plane crash
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 5:34 PM

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. हे विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. मात्र बारामतीच्या धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं.  विमान जमिनीला धडकताच मोठा स्फोट झाला, आणि विमानाला आग लागली. दरम्यान ही विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एका विमानाचा भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. हे जेट विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होते, विमानातील इंधन संपल्याने विजापूर जिल्ह्यातल्या  बाबलेश्वर तालुक्यातील मंगलोर गावाजवळ हे विमान शेतात कोसळलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ज्या विमानाचा अपघात झाला, ते जेट विमान सेस्ना 172 टँगो चार्ली हलके विमान होते. हे विमान कलबुर्गीहून बेळगावला निघाले होते. मात्र या विमानातील इंधन संपल्यामुळे हे विमान विजापूर जिल्ह्यातल्या  बाबलेश्वर तालुक्यातील मंगलोर गावाजवळ शेततात कोसळलं. हे विमान  रेड बर्ड एव्हिएशन नावाच्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेद्वारे चालवण्यात येते होते. जेव्हा हे विमान कोसळलं तेव्हा त्यामध्ये  कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी पायलट गौतम शंकर पीआर असे दोघे जण होते. या दुर्घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपाचारासाठी तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहचले आहेत.

विमानातील इंधन संपल्याचं पायलटच्या लक्षात आलं, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विमानाचं अपतकालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी पायलट गौतम शंकर पीआर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत.  या अपघातामध्ये विमानाचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. हे विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होत, त्याच दरम्यान हा अपघात झाला आहे.