AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक होता राजा, चौथी पास, मित्रासोबत देश लुटला, बँका लुटल्या.., केजरीवाल यांनी भर विधानसभेत सांगितली गोष्ट Video

दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना चौथी पास राजाची गोष्ट ऐकवली. यावेळी त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं.

एक होता राजा, चौथी पास, मित्रासोबत देश लुटला, बँका लुटल्या.., केजरीवाल यांनी भर विधानसभेत सांगितली गोष्ट Video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2023 | 5:43 PM
Share

नवी दिल्ली :  दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी आज भर विधानसभेत (Assembly) आमदारांना गोष्ट ऐकवली. एक होता राजा. फार शिकलेला नव्हता. चौथी पासच होता. पण त्याला खूप गर्व होता. राजा खूप भ्रष्टाचारी होता. त्याला पैशांचा हव्यास होता. या राजाला भाषण देण्याचा छंद होता. अशिक्षित असल्याने राजाने अनेक फायलींवर सह्यासुद्धा केल्या. राजा कमी शिकलेला असल्याने लोक त्याच्यावर टीका करत असत. त्यामुळे राजाने खोटी डिग्रीच तयार करून घेतली. तो स्वतःला एम ए पास म्हणू लागला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितल्यावर ही बाब केजरीवाल यांच्यावरच कशी उलटली, यावरून निशाणा साधला. आमदारांना गोष्ट ऐकवताना केजरीवाल म्हणाले, एक चौथी पास राजा होता. त्याने एमएची खोटी डिग्री तयार केली. माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मागितली तर लोकांवर त्याने 25-25 हजार रुपयांचा दंड ठोठवला. मोदींच्या डिग्री प्रकरणावरून केजरीवाल यांनी या गोष्टीद्वारे धारदार निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय.

टार्गेट मोदी, पुढची गोष्ट काय?

पुढची गोष्ट सांगताना अरविंद केजरीवाल म्हणाले, एक दिवस रात्री 8 वाजता राजाने सगळ्या चलनी नोटा बंद केल्या. देशात हाहाकार माजला. लोकांचे धंदे बंद पडले. लोकांकडे रोजगारही उरला नाही. त्यानंतर शेतकरी कायदे केले. मूर्खपणाने या राजाने ते तीन काळे कायदे मंजूर केले. त्यामुळे देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले.

चौथी पास राजाने मित्रासोबत मिळून देश लुटला. सरकारी ठेके मित्राला दिले. मित्राच्या नावाखाली देशात लूट चालवली. आधी बँका लूटल्या. मित्राला कर्ज वाटले. राजा आणि त्याच्या मित्राने सरकारी संपत्तीवर कब्जा केला… अशी गोष्ट केजरीवाल यांनी सांगितली.

दिल्लीच्या विधानसभेत आम आदमी पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थेट नाव न घेता निशाणा साधला. ही गोष्ट ऐकताना उपस्थित विधानसभा सदस्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. सोशल मीडियात आज केजरीवाल यांनी सांगितलेल्या गोष्टीचा व्हिडिओ चर्चेत आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.