…याला म्हणतात कपाळमोक्ष; इथं बदलही झेपेना आणि स्वप्न अध्यक्षपदाचे…

| Updated on: Sep 25, 2022 | 8:30 PM

राजस्थानातील गेहलोत गटातील अनेक आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आणखी जटील झाला आहे.

...याला म्हणतात कपाळमोक्ष; इथं बदलही झेपेना आणि स्वप्न अध्यक्षपदाचे...
Follow us on

जयपूरः राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी होणाऱ्या काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाच्या बैठक उशिरानेच होणार आहे. ही बैठक अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे गेहलोत गटाचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचेच सांगण्यात येत आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी आज होणारी बैठक उशिरानेच सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेहलोत गटाचे आमदार या बैठकीला येणार नसल्याचे सांगण्यात येत असून पक्षांतर्गत फूट पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचे मंत्री शांती धारिवाल यांच्या घरी गेहलोत गटाचे 56 आमदार उपस्थित आहेत. गेहलोत गट सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू नये अशा मागणीवर ठाम असल्याचेही दिसत आहे.

तर दुसरीकडे मात्र काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अशोक गेहलोत आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जयपूरमधील निवासस्थाना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली होती. मात्र अजूनही या बैठकीला सुरुवात झाली नसल्याने पक्षांतर्गत असणारी गटबाजी आता समोर आली आहे.

या बैठकीत राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात होते.

अशोक गेहलोत यांनी पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर सहमती दर्शवून राजीनामा दिल्यास गेहलोत गटातील आमदार पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करु शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासह राजस्थानचे मुख्यमंत्री पदही सांभाळावे अशीच त्यांच्या गटातील आमदारांची मागणी आहे.

गेहलोत गटातील अनेक आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी बैठक घेण्यात आली होती.

शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पक्षाचे डेप्युटी व्हिप महेंद्र चौधरी, आमदार दानिश अबरार, महेश जोशी आणि गोविंद राम मेघवाल उपस्थित होते.

मंत्री शांती धारीवाल यांनी आमदार आणि मंत्र्यांना एकत्र करून सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीलाच विरोध करण्यात आला आहे.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले आपत्ती आणि मदत व्यवस्थापन मंत्री गोविंद राम मेघवाल यांनी स्पष्टच सांगितले की, अशोक गेहलोत हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

आतापर्यंत त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला नाही, मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.