जे आसामनं केलं ते महाराष्ट्रानेही करावं? नवं वर्ष आई वडील, सासु सासऱ्यांसोबत घालवण्यासाठी 4 दिवसांची अतिरिक्त रजा

| Updated on: Nov 25, 2021 | 9:21 AM

वृद्धापकाळात असलेल्या आई-वडिलांची आणि सासू-सासऱ्यांची काळजी घेण्यासाठी आसामच्या मंत्रिमंडळाने (Assam Minister) एक अतिशय कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. त्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला चार दिवसांच्या खास सुट्टीची घोषणा केली आहे. ही सुट्टी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असेल.

जे आसामनं केलं ते महाराष्ट्रानेही करावं? नवं वर्ष आई वडील, सासु सासऱ्यांसोबत घालवण्यासाठी 4 दिवसांची अतिरिक्त रजा
himanta biswa sarma
Follow us on

गुवाहाटी : वृद्धापकाळात असलेल्या आई-वडिलांची आणि सासू-सासऱ्यांची काळजी घेण्यासाठी आसामच्या मंत्रिमंडळाने (Assam Minister) एक अतिशय कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. त्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला चार दिवसांच्या खास सुट्टीची घोषणा केली आहे. ही सुट्टी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असेल. हा वेळ ते त्यांच्या आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांसोबत घालवू शकतात.

जर कोणाचे आई-वडील किंवा सासू-सासरे इतर कुठल्या ठिकाणी राहात असतील तर ते जानेवारी महिन्यातील 6-7 तारखेला ते फक्त त्यांना भेटण्यासाठी, त्यांना फिरायला न्यायसाठी किंवा त्यांच्यासोबत घरीच वेळ घालवण्यासाठी सुट्टी वाढवू शकतात.

“जर वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा, मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला तर मला व्यक्तीगतरित्या अत्यंत आनंद होईल आणि ते राज्याच्या प्रगतीसाठी चांगलं काम करु शकतील”, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं.

हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वातंत्र्यदिनी ही घोषणा केली होती. भाजप सरकारने दरवर्षी कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची अतिरिक्त रजा देण्याचा निर्णय घेतला जेणेकरुन ते त्यांच्या पालकांसोबत वेळ घालवू शकतील.

संबंधित बातम्या :

आज पंतप्रधान मोदी करणार नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन; ‘असे’ असेल आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार, राजकीय चर्चांना उधाण