तिची भविष्यवाणी खरी ठरली! आधीच सांगितलं होतं विमानाचा अपघात होणार; काय होतं भाकित?

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताचे भाकित एका महिला ज्योतिषीने व्यक्त केले होते. या महिला ज्योतिषीची आता सगळीकडे चर्चा होत आहे.

तिची भविष्यवाणी खरी ठरली! आधीच सांगितलं होतं विमानाचा अपघात होणार; काय होतं भाकित?
ahmedabad plane crash prediction by astro sharmistha
| Updated on: Jun 12, 2025 | 8:20 PM

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातामुळे संपूर्ण जगालाच धक्का बसला आहे. या विमानात एकूण 242 लोक प्रवास करत होते. यातील फक्त एक प्रवासी बचावला आहे. दरम्यान, टेक ऑफ केल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत हा हे विमान एका इमारतीवर आदळले. त्यानंतर या विमानाचा स्फोट झाला. दरम्यान, आता या अपघातानंतर एका महिला ज्योतिषीचं भविष्य खरं ठरल्याचं बोललं जातंय. या महिला ज्योतिषीने काही दिवसांपूर्वीच या अपघाताचं भाकित केलं होतं.

विमान अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया विमान वाहतूक कंपनीच्या फ्लाईट-171 या विमानाचा अपघात झाला. नियोजित वेळेला उड्डाण घेतल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत हे विमान खाली कोसळले. विमानात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर हे विमान नेमके का कोसळले? याची माहिती समजू शकणार आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. यातील फक्त एक प्रवासी बचावला असून उर्वरित प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याच विमानात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

महिला ज्योतिषीने नेमकं काय सांगितलं?

हा विमान अपघात झाल्यानंतर आता एक्स या सोशल मीडियावर एका महिला ज्योतिषीची चर्चा होत आहे. अॅस्ट्रो शर्मिष्ठा असे या महिला ज्योतिषीचे नाव आहे. या महिलेने 5 जून रोजी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये महिला ज्योतिषीने मोठा विमान अपघात होणार असल्याचं भाकित केलं होतं. इस्त्रो ही भारताच्या अवकाश संशोधन संस्था जगाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. या संस्थेकडून अवकाश, उपग्रह अभियांत्रिकी, अवकाश पर्यटन या क्षेत्रात आगामी काळात इस्त्रो चांगली कामगिरी करणार आहे. नक्षत्रांचा अभ्यास करून मी गेल्या वर्षी 2025 साली विमान अपघात होईल, असे सांगितले होते. माझ्या या एक भाकित केलंह होतं. या भाकितावर मी अजूनही ठाम आहे, असं शर्मिष्ठा या महिला ज्योतिषीने आपल्या या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू

आता या महिलेचे हेच ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिला ज्योतिषीचे भविष्य खरे ठरले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, आता या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम वेगाने केले जात आहे. मृतदेह जळालेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता नातेवाईकांना डीएनएचा नमुना देऊन ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.