शाळा बंद, वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश, अलर्ट जारी, ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांमुळे हवा घातक, थेट…

इथिओपिया येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एकच खळबळ उडाली. या ज्वालामुखीतून निघालेली राख थेट भारतात येऊन पोहोचली. भारतातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण बघायला मिळतंय.

शाळा बंद, वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश, अलर्ट जारी, ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांमुळे हवा घातक, थेट...
Air pollution
| Updated on: Nov 26, 2025 | 7:40 AM

इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठी राख बाहेर आली. ही राख समुद्री मार्गे थेट भारतात मध्यरात्री दाखल झाली. ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतात मोठ्या संख्येने सरकताना दिसले. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये हवेमध्ये राखेचे कण जाणवत होते. भारतातील अनेक शहरांमध्ये हवा खराब झाली. अनेक जिल्ह्यांनी 447  प्रदूषण मर्यादा ओलांडली आहे. यापैकी 50 सर्वाधिक प्रदूषित जिल्ह्यांपैकी जवळजवळ निम्मे दिल्ली आणि आसाममध्ये आहेत. दिल्लीमध्ये अगोदरच वायू प्रदूशष प्रचंड असताना ज्वालामुखीच्या राखेच्या ढगाने कहर केला. हेच नाही तर जवळपास उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय काल विमान कंपन्यांनी घेतला. राखेच्या ढगामुळे विमानाचे इंजिन बंद होण्याची शक्यता होती.

ज्वालामुखीच्या राखेचे ढग आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे शाळा प्रशासनाने अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हेच नाही तर कंपन्यांनी थेट कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी CREA ने उपग्रह डेटाच्या माहितीनुसार वार्षिक प्रदूषण अहवाल प्रसिद्ध झाला. संपूर्ण हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यानंतरही प्रदूषित राहिले. त्यामध्येच आता प्रदूषणात झपाट्याने वाढ झाली.

दिल्लीमध्ये एक्यूआय 400 च्या पुढे गेले. यामुळे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने स्टेज-3 लागू केले. GRAP-A दरम्यान काही कारवाईचे आदेशही दिली आहेत. दिल्ली सरकारने याच पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी कार्यालयांना 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसला बोलवण्याचे आदेश दिले आहेत. 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावे, असे आदेश आहेत.

ज्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुविधा आहे, अशा शाळांना ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या शाळांमध्ये या सुविधा नाहीत, त्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. यासोबतच स्टेज-3 दरम्यान काही गोष्टी करण्यास बंदी असते. दिल्लीमध्ये स्टेज-3 लागू आहे. महत्वाच्या सुविधा यादरम्यान सुरू असतात. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच देशातील अनेक देशांच्या प्रदूषणात अत्यंत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.