AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबमध्ये तुफान राडा, वीटा आणि दगडांचा मारा, आकाली दलाच्या अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला

पंजाबच्या जलालाबाद येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे (Attack on shiromani akali dal president sukhbir singh Badals vehicle),

पंजाबमध्ये तुफान राडा, वीटा आणि दगडांचा मारा, आकाली दलाच्या अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला
| Updated on: Feb 02, 2021 | 3:44 PM
Share

चंदिगड : पंजाबच्या जलालाबाद येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यातून सुखबीर बादल बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. मात्र, काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे काँग्रेसचा हाथ असल्याचा आरोप अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात वीटा आणि दगडांचा मारा करण्यात आला आहे. याशिवाय गोळीबारदेखील झाल्याची माहिती समोर आली आहे (Attack on shiromani akali dal president sukhbir singh Badals vehicle).

राडा नेमका कशासाठी?

जलालाबादमध्ये काही दिवसांमध्ये निवडणूक होणार आहे. सध्या तिथे उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. संपूर्ण शहरात महापालिका निवडणुकीचं, प्रचाराचं वातावरण आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापताना दिसत आहे. या राजकारणाला आता हिंसेची देखील किनार लागताना दिसत आहे. कारण कालच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर आज एका उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल अकाला दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

सुखबीर सिंह बादल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जलालाबाद पोहोचले. मात्र, त्यांचा ताफा तिथे पोहोचताच अचानक गोंधळ सुरु झाला. लोक बॅरिकेट्स तोडून एकत्र येऊ लागले. त्यानंतर जोरदार दगडफेक झाली. त्याचबरोबर गोळीबाराचादेखील आवाज ऐकू आला. यावेळी सुखबीर सिंह यांच्या गाडीवर दगडफेक झाली. मात्र, सुदैवाने दगडफेकी दरम्यान ते त्या गाडीत नव्हते.

काँग्रेसवर आरोप

जलालाबादमध्ये उसळलेल्या हिंसाचारात अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. यूथ अकाली दलाचे अध्यक्ष रोमाना यांनी याप्रकरणी काँग्रेसवर आरोप केले आहेत. हल्लेखोर काँग्रेसच्या एका आमदाराच्या भावाच्या नेतृत्वात तिथे उपस्थित होते, असं त्यांनी सांगितलं (Attack on shiromani akali dal president sukhbir singh Badals vehicle).

पोलिसांची भूमिका काय?

या घटनेप्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही घटनास्थळी जाऊन तपास करत आहोत. दोघी बाजू समजून घेत आहोत. या घटनेमागील कारण काय याचा तपास लावत आहोत. एसएसपी फाजिल्का हरजीत सिंह यांनी या घटनेत चार जखमी झाल्याची माहिती दिली आहे. ते चार लोक नेमके कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत याचा तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : ‘या’ देशात ना लॉकडाऊन, ना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाचे सर्व नियमही रद्द, लोकांकडून जल्लोष

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.