‘या’ देशात ना लॉकडाऊन, ना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाचे सर्व नियमही रद्द, लोकांकडून जल्लोष

आइल ऑफ मेन (Isle of Man) मध्ये 31 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर लॉकडाऊन (Lockdown) हटवण्यात आला.

'या' देशात ना लॉकडाऊन, ना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाचे सर्व नियमही रद्द, लोकांकडून जल्लोष

नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनामुळे धास्तावलं आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोना (CoronaVirus Lockdown Lifted In Isle Of Man) लस उपलब्ध झाली आहे. पण, लसीकरणाला (Vaccine) सुरुवात झालेली असतानाही ब्रिटन, इजराईल, जर्मनी सारख्या देशांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) अद्यापही लागू आहे. पण, एक असा देश आहे जिथे लॉकडाऊन हटवण्यात आलं आहे. या देशातील लोक आता सेलिब्रेट करण्यासाठी पब्स, रेस्टॉरंट, बार आणि दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. इथे लोकांना पार्टी करताना दिसत आहेत (CoronaVirus Lockdown Lifted In Isle Of Man).

या देशाचं नाव ‘आइल ऑफ मेन (Isle of Man)’ आहे. जिथे सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांनाही रद्द करण्यात आलं आहे आणि लोक आता हळूहळू सामान्य जीवनात परतत आहेत.

आइल ऑफ मेन (Isle of Man) मध्ये 31 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर लॉकडाऊन (Lockdown) हटवण्यात आला. घडीचे काटे 12 वाजून एक मिनिट होताच लोक रस्त्यावर उतरले आणि आनंद साजरा करु लागले. लोकांच्या भावनांना पाहता बार आणि पब्सही पूर्णपणे तयार होते. रात्रीपासूनच लोकांनी सेलिब्रेट करण्यास सुरुवात केली होती.

या बेटावर 85,000 नागरिक राहतात. सरकारच्या या निर्णयानंतर आता येथे राहणाऱ्या लोकांना सोशल डिस्टेन्सिंग (Social Distancing) आणि कोरोनाचे इतर कायदे मानावे लागणार नाही. इतकंच नाही तर सरकारने मास्कवरील प्रतिबंधालाही हटवलं आहे. आता या बेटावर असलेल्या सर्व शाळा आणि दुकानंही पूर्णपणे उघडली आहेत आणि लोकांना त्यांच्या घरात राहायची गरज नाही.

आम्ही सरकारचे आभारी आहोत – नागरिक

31 जानेवारीला आइल ऑफ मेनवर कोरोनाचे फक्त 15 रुग्ण होते. त्यानंतर सरकारने लॉकडाऊन आणि इतर कोरोना प्रतिबंधांना हटवण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाने स्थानिक लोकांनी सांगितलं, ते आभारी आणि उत्साहित आहेत (CoronaVirus Lockdown Lifted In Isle Of Man).

लॉकडाऊनमुळे हा देश जगापासून वेगळे झाले होते, असं इथल्या लोकांना वाटत होतं. बेटावरील एका निवासीने सांगितलं की काही कोरोना नाही, त्यामुळे लोक उत्साहित आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. पण, त्यासोबतच इतर अडचणाीही आहेत.

आइल ऑफ मेन (Isle of Man) जवळ शेजारी देश ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. इथे एका दिवसात 21,088 जणांना कोरोनाची लागण झाली तर 587 जणांनी आपला जीव गमावला.

CoronaVirus Lockdown Lifted In Isle Of Man

संबंधित बातम्या :

‘2021 हे जागतिक आरोग्य स्थानिक स्तरावर आणणारे वर्ष’; बिल आणि मेलिंडा गेट्स यांचे वार्षिक पत्र प्रसिद्ध

कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक

सावधान, कोरोनापासून वाचवणारं सॅनिटायझर तुमच्या मुलाला आंधळं करु शकतं, धक्कादायक खुलासा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI