
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला, तर मृत्यू 1996 साली झाला. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील हजारो वर्षांचं भाकीत वर्तवलं आहे. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भाकितांपैकी काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो, बाबा वेंगा यांची जी भाकीतं खरी ठरली आहेत, त्याच्यामध्ये जपानमध्ये आलेली त्सुनामी, हिटलरचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला हल्ला, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू आणि दुसऱ्या महायुद्धाबाबत केलेल्या भविष्यवाणींचा समावेश आहे. दरम्यान बाबा वेंगा यांच्याबद्दल असं देखील बोललो जातं की, त्या लहान असताना एका वादळात सापडल्या होत्या या वादळामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली, त्यानंतर त्यांना दिव्यदृष्टिची प्राप्ती झाली आणि त्यानंतर बाबा वेंगा यांनी भविष्य सांगण्यास सुरुवात केली, असा दावा केला जातो.
दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल वर्तवलेली काही भाकीत समोर आली होती, ती खरी ठरल्याचा दावा देखील करण्यात येत आहे, 2025 मध्ये अनेक ठिकाणी भयानक भूकंप होतील, जगावर युद्धाचं सावट असेल, अनेक देशांना महापुराचा सामना करावा लागेल असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं होतं, दरम्यान 2025 मध्ये अनेक देशांना प्रचंड मोठे भूकंपाचे धक्के जाणवले, अनेक देशांवर महापुराचं संकट देखील आलं, तसेच काही देशांमध्ये युद्ध झाल्याचं देखील पहायला मिळालं. दरम्यान आता 2025 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, आपण लवकरच नव्या वर्षात प्रवेश करणार आहेत. 2026 हे वर्ष काही राशींच्या लोंकासाठी आनंद घेऊन येणार असल्याचं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.
वृषभ – बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार 2026 हे वर्ष वृषभ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि लाभदायी ठरणार आहे. हा काळ या राशींच्या लोकांसाठी असा आहे की, या वर्षात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत.
सिंह – सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष अनेक आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे. सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष सर्वच क्षेत्रामध्ये अनुकूल राहणार आहे, या वर्षामध्ये करिअरमध्ये मोठी प्रगती होणार असून, आर्थिक समस्यांमधून सुटका होणार आहे.
कन्या – बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरणार आहे. हे वर्ष या राशींच्या लोकांना अनेक नव्या संधी घेऊन येणार आहे.
वृश्चिक – वृश्चिक राशीसाठी 2026 हे वर्ष मोठं लाभाचं ठरणार आहे, या काळात या लोकांच्या हाती एखादा मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे.
मकर – बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार मकर राशीसाठी हे वर्ष कष्ट आणि परिश्रमाचं फळ देणारं वर्ष आहे, या वर्षी या राशीच्या लोकांची अनेक महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहेत.