
Baba Vanga Predictions 2026: जगभरात बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणी, भाकीताची चर्चा होतेच. तिने अनेक भविष्यवाण्या, भाकीतं केली आहेत. त्या अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. बाबा वेंगा हिने वर्ष 2026 मध्ये युद्ध होणार आणि मानव जातीवर एक मोठं संकट येणार असल्याचा दावा केला. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. दोन्ही देशात केव्हापण युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच चीन, रशियासह इराणच्या लष्कराने संयुक्त युद्ध सराव सुरू केला आहे. इस्त्रायलची भूमिका पण निर्णायक असेल. जर अमेरिकेने इराणवर हल्ला चढवला तर भीषण युद्धाला तोंड फुटू शकते.
बाबा वेंगा हिची भविष्यवाणी
बाबा वेंगा हिने वर्ष 2026 मध्ये तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे भाकीत केले आहे. तिने वर्ष 2026 हे युद्ध आणि मानव जातीच्या संकटाचे वर्ष म्हटले आहे. जगातील पूर्व भागात एक मोठे युद्ध होईल. या सर्वात मोठ्या युद्धाच्या भडक्यात अनेक देश होरपळले जातील. लाखो लोकांचा जीव जाईल. महिला आणि मुलांवर मोठे संकट येईल. हे युद्ध पुढे जगभर पसरेल. दुसर्या महायुद्धानंतर जगात युद्ध झालीच नाही असं नाही. पण जग दोन छावण्यात विभागले जाण्यापासून वाचले आहे. पण आता डोनाल्ड ट्रम्प, व्लादीमीर पुतिन यांच्या भूमिकेने, चीनच्या विस्तार आणि आक्रमक हालचालींमुळे मोठे काही तरी घडण्याची भीती वाढली आहे. इराणही युद्धासाठी आसुसलेला दिसत आहे.
त्यामुळे बाबा वेंगा हिची भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
कुठे कुठे मोठे संकट
बाबा वेंगाच्या भाकितानुसार, या युद्धामुळे जगातील पश्चिमी देशांना मोठा फटका बसू शकतो. युरोपस मध्य आशियाला मोठा धोका आहे. रशिया जर इराणच्या बाजूने उतरला. तर नाटो मोठी सैन्य कारवाई करेल. चीन ही या युद्धात उतरेल. अनेक देशांना इच्छा नसतानाही या युद्धात सहभागी व्हावं लागेल. त्यात अनेक देशांवर आर्थिक संकट कोसळेल. महागाईचा भडका उडेल आणि अनेकांना जीव गमवावा लागेल.
केव्हा सुरू होऊ शकते युद्ध?
या भविष्यवाणी नुसार हे जागतिक युद्ध मार्च-एप्रिल 2026 मध्ये सुरू होऊ शकते. या युद्धात रशियाचा गट आणि अमेरिकेचा गट थेट आमने-सामने असतील. या युद्धात पुन्हा युरोप बेचिराख होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा भूभाग पुन्हा युद्धाच्या झळांमध्ये नष्ट होईल. तर रशिया एक मोठी शक्ती म्हणून समोर येईल. बाबा वेंगा हिच्या भाकितानुसार युद्धानंतर जगात भारताचाही दबदबा वाढेल.
सूचना : शास्त्रज्ञ बाबा वेंगाची भाकीतं मानत नाहीत. हे सर्व दावे खोटे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बाबा वेंगा हिची भाकीतं ही काव्यात्म आहे आणि ती फारशी लिखित नाहीत. विशेष म्हणजे ती एखाद्या प्रदेशाचं, देशाचं नाव घेऊन केलेली नाही तर या काळात अशा घटना घडू शकतात असा तिचा दावा आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी तशी घटना जुळून येऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञ तिच्या भविष्यवाणीकडे लक्ष देत नाहीत.