Baba Vanga Predictions : बाबा वेंगांचं 2026 बद्दलचं भाकीत पहिल्यांदाच समोर, जगाला हादरवणारी भविष्यवाणी

बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं वर्तवली आहेत, आता त्यांनी 2026 या वर्षाबद्दल वर्तवलेलं भाकीत समोर आलं आहे. 2026 मध्ये अशा काही घडामोडी घडणार आहेत, ज्यांचा संपूर्ण जगावर कायमस्वरुपी परिणाम होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

Baba Vanga Predictions : बाबा वेंगांचं 2026 बद्दलचं भाकीत पहिल्यांदाच समोर, जगाला हादरवणारी भविष्यवाणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 7:51 PM

बाबा वेंगा या एक महान भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक जगप्रसिद्ध भविष्यवाणी केल्या आहेत. त्यातील अनेक खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 साली झाला मात्र त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी तब्बल 5079 वर्षांपर्यंतची भविष्यवाणी करून ठेवली आहे. बाबा वेंगा यांनी ज्या भविष्यवाणी केल्या आहेत, त्यामध्ये नैसर्गिक आपत्तिपासून ते राजकीय उलथापालथीपर्यंत आणि तिसऱ्या महायुद्धाची देखील भविष्यवाणीचा समावेश आहे, आता 2026 मध्ये काय होणार आहे, आणि 2026 बाबत बाबा वेंगा यांनी नेमकं काय सांगीतलं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक लोकांना आहे, चला तर जाणून घेऊयात बाबा वेंगा यांनी 2026 बद्दल नेमकं काय भाकीत केलं आहे? त्याबद्दल.

बाबा वेंगा यांनी 2026 ते 2028 या काळात जागतिक उपासमारीची समस्या पूर्णपणे समाप्त होईल असं भाकीत वर्तवलं आहे. 2026 मध्ये चीन आर्थिक आणि सौन्य शक्तिच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून पुढे जाईल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती होऊन अनेक नवीन शोध लागतील आणि या काळात तिसऱ्या महायुद्धाची देखील शक्यता आहे, असं भाकीत 2026 संदर्भात बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.बाबा वेंगा यांनी 2025 बाबत देखील मोठं भाकीत वर्तवलं होतं, त्यातील अनेक भाकीतं खरी ठरल्याचं पहायला मिळालं.

2025 हे जगाच्या अंताची सुरुवात असेल, या वर्षी मोठे भूकंप येतील, प्रचंड प्रमाणात महापूर पहायला मिळतील, युद्ध होतील असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं होतं, बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं ठरलं, अनेक देशांमध्ये या काळात विनाशकारी भूकंप आले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. एवढंच नाही तर इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध झालं, भारत आणि पाकिस्तानमध्ये देखील संघर्ष पहायला मिळाला. बाबा वेंगा यांनी जे जगप्रसिद्ध भाकीत केले आहेत, त्यामध्ये हिटलचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला हल्ला, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्सुनामी अशा काही भाकीतांचा समावेश आहेत, ही सर्व भाकीतं खरी ठरल्याचा दावा बाबा वेंगा यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)