
Dhirendra Shastri Health Update : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या सनातन एकता पदयात्रेचा आज आठवा दिवस असून आज सलग तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. मथुरेत पदयात्रेच्या आठव्या गिवशी ताप, लो ब्लड प्रेशन आणि श्वास घेण्यास त्यांना त्रास होता , त्यामुळे त्यांना भररस्त्यातच झोपून आराम करावा लागला. लोकांनी त्यांना टॉवेलने वारा घालून आराम देण्याचा प्रयत्न केला. धीरेंद्र शास्त्री यांच्या फुफ्फुसात खूप धूळ साचल्याचे निदान डॉक्टरांनी केले असून, त्यामुळेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र त्यांनी मास्क घालण्याचा सल्लाही नाकारला.
धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती पहिल्या दिवसापासूनच खराब होती , पण कोणाच्याहू भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्यांनी यात्रा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि कोणतीच औषधंही घेतली नाहीत , असं डॉक्टरांनी नमूद केलं. त्यांना सध्या 100 अंश फॅरेनहाइट ताप असून आणि त्यांचा रक्तदाबही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. अनवाणी चालण्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली आहे असं दौऱ्यात त्यांच्यासोबत आलेले उत्तर प्रदेशचे शक्तिशाली नेते राजा भैया म्हणाले.
विरोधकांवर कडाडून टीका
एवढी प्रकृती बिघडूनही धीरेंद्र शास्त्री यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. भारतीय शेतकऱ्यांना समर्पित या आठव्या दिवसांच्या पदयात्रेत, कोसी कलामध्ये धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ज्यांना राम नाम, वंदे मातरम किंवा जय श्री राम याबद्दल अडचण आहे त्यांनी लाहोरला जाण्यासाठी तिकिटं बुक करावीत. जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर कर्ज घेऊन त्यांच्या पैशांनी तिकीटं बूक करून देतील, कारण जे रामासोबत नाहीत ते निरुपयोगी आहेत असा हल्ला त्यांनी चढवला.
मी मुस्लिमांच्या विरोधात नाहीत, तर देशाचे शत्रू असलेल्यांच्या विरोधात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोध करणाऱ्या हिंदूंनी डीएनए टेस्ट करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला.
मुस्लिम शिक्षण धोरणावर मोठे विधान
दंगलखोर आणि दहशतवादी-धार्मिक लोकांचे शिक्षण धोरण देशात बॉम्बस्फोट करणे आहे, तर सनातनी नारळ फोडतात हे देशाचे दुर्दैव आहे असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यापूर्वी म्हणाले होते. बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांऐवजी अब्दुल कलाम यांच्यासारखे लोक उदयास येतील असे म्हणत त्यांनी मुस्लिम बांधवांना त्यांचे शिक्षण धोरण बदलण्याचे आवाहन केले.
धीरेंद्र शास्त्री यांची 55 किलोमीटरची पदयात्रा 16 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. गुरुवारी, त्यांनी मथुरा सीमेवरून दिल्ली आणि हरियाणा मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश केला.