AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोमांस तस्करीच्या संशयावरुन तीन आदिवासींना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण, मारहाणीत दोघांचा मृत्यू, बजंरग दलावर आरोप

सिवनीमध्ये मंगळवारी मॉब लिचिंगचा प्रकार समोर आला आहे

गोमांस तस्करीच्या संशयावरुन तीन आदिवासींना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण, मारहाणीत दोघांचा मृत्यू, बजंरग दलावर आरोप
MP mob lynchingImage Credit source: twitter
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: May 03, 2022 | 10:25 PM
Share

सिवनी, मध्यप्रदेश – मध्य प्रदेशात सिवनीमध्ये मंगळवारी मॉब लिचिंगचा (Mob lynching)आणखी एक प्रकार समोर आला आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरुन जमावाने तीन आदिवासींना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोन तरुणांच्या मृत्यूच्या घटनेचं वृत्त कळताच सातपलेल्या आदिवासी तरुणांनी जबलपूर-नागपूर (Jabalpur-Nagpur)महामार्गावर रास्तारोको आंदोनही केलं. हे सर्व प्रकरण कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. दोन आदिवासींची हत्या आणि रास्तारोको आंदोलनानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरई गावातील रहिवासी सगार आणि सिमरीया गावातील धानशाह आणि संपत बट्टी या तिघांना जमावाने लाठ्यांनी जबर मारहाण केली. मारहाण करणारे बजरंग दलाचे (Bajrang Dal)कार्यकर्ते होते, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. हा सर्व प्रकार समजल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. बरघाटचे काँग्रेसचे आमदार अर्जुनसिंह काकोडिया हेही घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतापलेल्या गावकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला. आरोपी हे बजरंग दलाचे कार्यकर्ते असलव्याचा आरोपही आमदारांनी केला. आरोपींना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

MP mob lunching

MP mob lunching

घटनास्थळी १२ किलो मास सापडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी १२ किलो मास जप्त करण्यात आले. हे मास पोलिसांनी जप्त केले असून, फॉरेन्सिक तपासणीसाठी ते पाठवण्यात आले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाला जंगलराज असल्याचे संबोधत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य केले आहे.

MP mob lunching 2

MP mob lunching 2

कमलनाथ यांनी तीन आमदारांची समिती केली स्थापित

मध्यप्रदेश काँग्रेसने ही घटना अत्यंत गांभिर्याने घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ही घटना अत्यंत दुखद असल्याचे सांगितले आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तीन आमदारांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही कमलनाथ यांनी दिली आहे. ही समिती घटनास्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईकांना भेटणार आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल प्रदेश काँग्रेस समितीला सादर करण्यात येणार असल्याची माहितीही कमलनाथ यांनी दिली आहे. या समितीत आदिवासी भागातील ओकारसिंह मरकाम. अशोक मर्सकोले आणि नारायण पट्टा या आमदारांचा समावेश आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?