CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?

CJP Sourav Das: कॉक्रोच जनता पार्टाने तरुणाईची नाडी ओळखली. या टीममधील अनेक चेहरे देशभरात लोकप्रिय ठरली. त्यातील काही जण आता दोनाचे चार हात करण्याच्या वयातील आहे. त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सोशल मीडियातून होते. पक्षातील प्रमुख नेता सौरव दास याच्या लग्नाविषयी अशीच चर्चा रंगली आहे.

CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
रत्ना सिंह सौरव दास, सीजेपी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 26, 2026 | 2:26 PM

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीतील काही चेहऱ्यांनी देशभरात प्रसिद्धी मिळवली. अभिजीत दिपकेंसह सौरव दास, आशुतोष रांका यांची चर्चा झाली. सीजेपीवरील आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि पक्षाचे ध्येयधोरणं मांडण्यात सौरव दास हा चुणचुणीत तरुण नेहमी समोर आला. आताही तो चर्चेत आहे. पण एका खास कारणासाठी सौरव दास हा रिलेशनशीपमध्ये आहे की, सिंगल? अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रश्नावर आता त्यानेच समोर येत उत्तर दिले आहे. मागे अभिजीतच्या आई-वडिलांनीही त्यांच्या लग्नाचा विचार बोलून दाखवला होता.

यंदा कर्तव्य आहे?

एका मुलाखतीदरम्यान सीजेपीचे प्रवक्ते आणि सहसंयोजक सौरव दास यांना यंदा कर्तव्य आहे का? असा सवाल विचारल्या गेला. अनेकींना तो सिंगल आहे की रिलेशनशिपमध्ये याची उत्सुकता असल्याचा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर आपण अद्याप एकटेच असल्याचे उत्तर त्याने दिले. सौरव दास यांच्यासोबत त्यांची साथीदार, मैत्रिण आणि प्रवक्ता रत्ना सिंह हिचे नाव जोडल्या जात होते. या मुलाखतीवेळी रत्ना सिंह ही सुद्धा उपस्थित होती. हाच प्रश्न रत्नाला विचारण्यात आल्यावर तिनेही हेच उत्तर दिले. सौरव सोबत आपण कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाहीत, आम्ही दोघे केवळ मित्र आहोत असे तिने सांगितले.

नवीन चेहऱ्यांवर तरुणाईचा विश्वास

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या झुरळावरील एका टिप्पणीने क्रॉक्रोच जनता पार्टी तयार झाली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी आपण असे म्हटलेच नाही असे जाहीर केले. 16 मे रोजी अभिजीत दिपके यांनी सीजेपीची स्थापना केली. सुरुवातीला काही प्रवक्त्यांची नावं जाहीर करण्यात आली. त्यात आशुतोष रांका, विजेता दहिया, सौरव दास आणि इतर काहींची नावं समोर आली. सौरव दास यांनी सरकारविरोधात पक्षाची भूमिका मांडली. भाजपकडून करण्यात येणारे आरोप आणि टीकेला उत्तर दिले. पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. अखेर या नवख्या पक्षासमोर सरकारला झुकावे लागले. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता पक्षाने शाळा दुरुस्तीची मोहिम हाती घेतली आहे.

सौरव दास कोण?

सौरव दास हा एक पत्रकार आहे. तो माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. शोधवार्तेसह तो सरकारकडे माहिती अधिकारात विविध माहिती मागवतो. त्याआधारे वार्ता देतो. अनेक बातमीदारी करणाऱ्या वेबसाईटसाठी तो लेख लिहितो. त्याचे पक्ष प्रवक्ते पदासह सहसंयोजक पदही आहे. आता सध्या त्याच्या पक्षाची, दबाव गटासारखी वाटचाल सुरू आहे.

Follow Us