
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओके आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, भारतानं केलेल्या या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.
भारतानं पाकिस्तानचे पाच एअरबेस आणि दोन रडार उद्ध्वस्त केले. त्यांच्या लढाऊ विमानांंचं देखील मोठं नुकसान झालं. दोन्ही देशांमध्ये तणाव चांगलाच वाढला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे . त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली.
दरम्यान जर युद्धासारखी परिस्थिती उद्भवली किंवा आणीबाणी घोषीत करण्यात आली तर प्रत्येकाच्या घरामध्ये काही वस्तू असणं गरजेच्या असतं, ज्याची अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खूप मदत होऊ शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
एलईडी टॉर्च – आणीबाणी किंवा युद्धाच्या परिस्थितीमध्ये एलईडी टॉर्च जो शेलवर चालतो हा खूप महत्त्वाचा असतो, युद्धाच्या काळात अनेकवेळा ब्लॅकआऊटचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीमध्ये एलईडी टॉर्च महत्त्वाच आहे,.
रेडिओ – आणीबाणी किंवा युद्धाच्या काळामध्ये टीव्ही, मोबाईल यासारखे इतर उपकरणे चालतील की नाही याची शाश्वती नसते, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला रेडिओ उपयोगाचा ठरू शकतो, त्यावरून तुम्हाला युद्धासंदर्भात अधिकृत माहिती आणि इतर सूचना मिळू शकतात.
सोलर पावर बँक – तुमच्याकडे एक सोलर पावर बँक असणं देखील गरजेचं आहे, जी सूर्याच्या प्रकाशावर चार्ज होईल, त्यामुळे तुम्हाला विजेची व्यवस्था होऊ शकते.
Hand Crank Phone Charger : आणीबाणीच्या काळात मोबाईल स्विचऑफ होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते, तुम्ही या चार्जरच्या माध्यमातून वीज नसताना देखील तुमचा मोबाईल चार्ज करू शकता.
वॉटर फिल्टर – आणीबाणीच्या काळात किंवा युद्धाच्या काळात तुमच्याकडे पोर्टेबल वाटर फिल्टर देखील असणं गरजेचं आहे.