पाकचं विमान दिसताच पाडा, युद्धासाठी तयार राहा, भारतीय वायूसेनेला आदेश

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेतला संघर्ष …

, पाकचं विमान दिसताच पाडा, युद्धासाठी तयार राहा, भारतीय वायूसेनेला आदेश

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेतला संघर्ष वाढलाय. एकीकडे राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरु आहे, तर दुसरीकडे हायअलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या विमानतळांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये अमृतसर, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट या विमानतळांचा समावेश आहे. शिवाय भारतीय वायूसेनेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या विमानांनी जम्मू काश्मीरमधील नौसेरामध्ये घुसखोरी करत बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. ही विमाने भारतीय वायूसेनेने वेळीच पिटाळून लावली. शिवाय पाकिस्तानचं प्रमुख F-16 हे विमान भारताने पाडलंय. पाकिस्तानचं विमान दिसताच पाडा, असा आदेश भारतीय वायूसेनेला देण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही देशांच्या वायूसेनेचा संघर्ष टोकाला पोहोचलाय.

पाकिस्तानचं विमान पाडलं

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने वेळीच उत्तर दिलं आणि हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे. हे विमान पडत असताना पायलट पॅराशूटच्या माध्यमातून उडी फेकत असल्याचंही दिसून आलंय.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *