AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायाचं आहे, तर अशा स्थितीमध्ये सर्वसामान्यपणे डॉक्टर त्या व्यक्तीच्या आरोग्याची माहिती घेतात. परंतु भारतामध्ये असे काही ठिकाणं आहेत, जिथे रुग्णाला सर्वात आधी त्याची जात विचारली जाते.

ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टर जात का विचारतात?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 7:03 PM
Share

एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर सामान्यपणे त्या व्यक्तीची आरोग्यस्थिती जाणून घेतो. ऑपरेशन करण्यापूर्वी संबंधित रुग्णाचा बीपी किती आहे? शुगर किती आहे? त्याचा रक्तगट कोणता आहे? या सर्व गोष्टींची नोंद ठेवली जाते. तसेच पूर्वी या व्यक्तीला एखादा आजार होता का? त्याची मेडिकल हिस्ट्री देखील चेक केली  जाते. ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टर संबंधीत रुग्णाच्या बदलत जाणाऱ्या आरोग्याच्या बाबतीत बारीक -बारीक तपशीलाची देखील नोंद करून ठेवतात, आणि त्यानंतर रुग्णाचं ऑपरेशन करण्यासाठी त्याला भूल दिली जाते.

परंतु तुम्ही कधी असं ऐकलं आहे का? की अशेही काही रुग्णालय आहेत, जिथे रुग्णाला ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारली जाते? हे तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल परंतु ही गोष्ट सत्य आहे, भारतामधील असे काही भाग आहेत, जिथे रुग्णाला ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारली जाते. त्या मागचं कारण देखील तितकचं महत्त्वाचं आहे.

तामिळनाडू, आध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक सारख्या काही राज्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या काही विशिष्ट समाजामध्ये जसं की, आर्य वैश्य तसेच कोमुट्टी चट्टियार समाजाच्या लोकांमध्ये अनुवंशिकपणे स्यूडोकोलिनस्टेरेज (Pseudocholinesterase)  नावाच्या एन्झाइमची कमतरता आढळते, जवळपास सर्वच लोकांमध्ये ही समस्या आढळते. यामुळे होतं असं की, जेव्हा ही समस्या एखाद्या व्यक्तीला असते, तेव्हा त्या व्यक्तीला भूलीचं इजेक्शन दिल्यानंतर त्याचा परिणाम हा इतर रुग्णांच्या तुलनेत खूप जास्त काळ  राहतो. अशा स्थितीमध्ये संबंधित रुग्णाच्या शरीरात काही गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. ही रीस्क टाळण्यासाठीच तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या सारख्या राज्यात काही रुग्णालयांमध्ये ऑपरेशन करण्यापूर्वी रुग्णाची जात विचारली जाते. या संदर्भात एका वृत्तवाहिनी माहिती दिली आहे.

त्या अनुषंगाने अधिक काळजी घेणं डॉक्टराला सोपं जातं. रुग्णाच्या शरीरात ऑपरेशन करण्यापूर्वी नेमकं किती भुलीचं औषध इजेक्ट करायचं आहे, याची मात्र ठरवता येते. त्यामुळे काही ठिकाणी डॉक्टर रुग्णालचं ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारतात, आणि त्यानुसार योग्य ते उपचार सुरू करतात.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा