AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडखोर खासदारांना मोठा धक्का; भाजपने अचानक साथ सोडली, घेतला महत्वाचा निर्णय

बंडखोर खासदारांना मोठा धक्का बसला. पश्चिम बंगालमध्ये भाजपने अचानक बंडखोरांची साथ सोडली. त्यांनी आगामी निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

बंडखोर खासदारांना मोठा धक्का; भाजपने अचानक साथ सोडली, घेतला महत्वाचा निर्णय
west bengal news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 11:31 AM
Share

पश्चिम बंगालमध्ये महापालिका निवडणूक होणार आहेत. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांना मोठा झटका दिला आहे. भाजपने ही निवडणूक कोणत्याही युतीशिवाय लढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये कोलकाता महापालिका, हावडानगर महापालिकेची निवडणूक होणार आहे. परंतु निवडणुकीच्या तारखेची घोषणा झालेली नाही. या निवडणुकीत बंडखोरांचा गट देखील उतरण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर हा गट नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडिया पक्षात विलीन झाला होता. यात सायोनी घोष, काकोली घोष दस्तीदार,युसूफ पठाण, सुदीप बंदोपाध्याय यांच्या नावाचा समावेश आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य म्हणाले, ‘पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकीत भाजप कोणाशीही युती करणार नाही. कोलकाता आणि हावडानगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आणि जिंकणार. दिल्लीत NCPI सोबत एखादा करार होऊ शकतो. परंतु दिल्ली आणि कोलकातामध्ये 1500 किलोमीटरचं अंतर आहे’. भाजपच्या एका नेत्याने म्हटलं की, पक्ष स्वत:ची संघटना, नेते, कार्यकर्त्यांवर विसंबून राहू इच्छित आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर आमची पहिली निवडणूक आहे. राष्ट्रीय राजकारणात फरक असतो. NCPI ने जरी भाजपशी हातमिळवणी केली. परंतु पक्षात टीएमसीचे माजी नेते आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधातच निवडणूक लढली होती. मागच्या निवडणुकीत काहींचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्यासोबत हातमिळवणी केली, तर चुकीचा संदेश जाईल’.

दस्तीतर यांच्यासहित दिल्लीत सर्व बंडखोर खासदारांची बैठक झाली होती. यात सायोनी घोष यांच्या नावाचाही समावेश आहे. निवडणुकीआधीच कोलकाता आणि हावडानगर महापालिकेच्या मतदारसंघ पुनर्रचनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोलकातामध्ये वॉर्डची संख्या 209 इतकी होईल. आता कोलकातामध्ये 144 वॉर्ड आहेत. तर हावडानगरमधील 50 वॉर्डची संख्या ही 68 होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस देखील महापालिका निवडणुकांची तयारी करत आहेत. त्यांच्या पक्षाचे कुणाल घोष यांनी म्हटलं की, आम्ही तयार आहोत. आम्ही चांगली कामगिरी करू. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत आम्हाला आक्षेप असून सर्व लोकसंख्येच्या आधारावर केले पाहिजे. परंतु भाजप मतदारांचा विचार करून पुनर्रचना करत आहेत, असा आरोप घोष यांनी केला.

Follow Us
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!