जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, सैन्याचा ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला, 10 जवान शहीद, 10 जखमी

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठी दूर्घटना घडली आहे, डोडामधून जात असलेला सैन्यदलाचा ट्रक खोल दरीमध्ये कोसळला, या घटनेत दहा जवान शहीद झाले आहेत. तर दहा जण जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, सैन्याचा ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला, 10 जवान शहीद, 10 जखमी
| Updated on: Jan 22, 2026 | 3:54 PM

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठी दूर्घटना घडली आहे, डोडामधून जात असलेला सैन्यदलाचा ट्रक खोल दरीमध्ये कोसळला, या घटनेत दहा जवान शहीद झाले आहेत. तर दहा जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्य दलाचा हा ट्रक डोडाच्या भद्रवाह चंबा रोडवरून जात होता, याचदरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे, सैन्यदलाचं वाहन तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळलं. या दुर्घटनेत दहा जाणांचा मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

ही दुर्घटना नेमकी कशी घडली? जवान घेऊन जात असलेला ट्रक दरीत कसा कोसळला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, एका अधिकाऱ्यानं घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार अज्ञात कारणामुळे हा ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहेत. तर या अपघातामध्ये जे सैनिक जखमी झाले आहेत, त्यांना अपघात स्थळावरून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. भारतीय सैन्य दलाचं हे वाहन सैनिकांना एका उंच जागेवर पोस्टिंगसाठी घेऊन निघालं होतं, त्याचदरम्यान अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन दोनशे फूट दरीत कोसळलं.

दरम्यान उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. डोडामध्ये झालेल्या दुर्घटनेत आपण आपल्या देशाचे 10 शूर जवान गमावले आहेत, या घटनेमुळे खूप दु:ख झालं आहे. आम्ही सैन्यांच्या या सर्वोच्च बलिदानाला कायम लक्षात ठेवू, अशा या संकट काळात संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. या दुर्घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत, तर दहा जाण गंभीर जखमी झाले आहेत, जखमी जवानांना एअरलिफ्ट करून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांना उपचारासंदर्भात योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून, हे जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो असं मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.