साक्षात डोनाल्ड ट्र्म्प यांच्या नावाने महाघोटाळा, अनेकांचे लाखो रुपये गडप, काय होती स्कीम

एका तर वकिलाचे सुमारे सहा लाख रुपये या स्कीममध्ये बुडाले आहेत. सायबर क्राईमने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. या संदर्भातील अन्य पीडितांशी संपर्क केला जात आहे.

साक्षात डोनाल्ड ट्र्म्प यांच्या नावाने महाघोटाळा, अनेकांचे लाखो रुपये गडप, काय होती स्कीम
| Updated on: May 26, 2025 | 8:15 PM

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने महाघोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात २०० हून अधिक भारतीयांना चांगलाच चुना लागला आहे. या सायबर फ्रॉडमध्ये भले भले लोक अडकले आहेत. यामुळे ट्रम्प याच्या रियल इस्टेट बिझनेसच्या नावाने लोकांना उल्लू बनविण्यात आले. आणि लोकांनीही साक्षात ट्रम्प सांगत आहेत म्हणून डोळे आणि मेंदू दोन्ही झाकून आपल्या आयुष्याची जमापुंजी या स्कीममध्ये गुंतवली आणि आता पैसे गडप झाल्याने हे लोक मेटाकुटीला आले आहेत.

आपल्या शेजारील कर्नाटक राज्यात एक वेगळाच घोटाळा उघडकीस आला आहे. कर्नाटकात जवळपास २०० हून अधिक जणांना सायबर चाच्यांनी ऑनलाईन लुटले आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एआय जनरेटेड व्हिडीओचा वापर सायबर गुन्हेगारांनी केला. या इन्व्हेस्टमेंट स्कीमची माहीती ट्रम्प हॉटेल रेंटल्स नावाने साक्षात ड्रोनाल्ड ट्रम्प देत आहेत म्हटल्यावर सर्वांनी खातर जमा न करता पैसा गुंतवला. या ‘ट्रम्प हॉटेल्स रेंटल्स’ या योजनेत पैसा लावणारे सर्व जण डुबले आहेत. मोठा परतावा मिळणार या आमीषाने अनेकांनी कर्ज काढून पैसे गुंतवले होते, त्या सर्वांना फटका बसला आहे.

कसे जाळे पसरवले ?

या घोटाळ्यातील सर्वात खतरनाक पद्धत म्हणजे एआयने साक्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा एआय द्वारे बनवलेला व्हिडीओ…या व्हिडीओत डोनाल्ड ट्रम्प बोलताना दिसत आहेत. भारतातील कोणताही व्यक्ती “Trump Hotel Rentals” मध्ये गुंतवणूक करुन मोठा नफा मिळवू शकतो. या व्हिडीओला युट्युब शॉर्ट्स आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे साध्याभोळ्या लोकांचा पटकन विश्वास बसला. या लोकांनी या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंक क्लिक केल्या. त्यांच्या मोबाईलमध्ये एक मोबाईल App ओपन झाले. युजरने फॉर्म भरुन बँक अकाऊंट आणि IFSC कोड सर्व माहीती मागितली गेली. सुरुवातीला १५०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आली. त्यानंतर दरदिवशी ३० रुपये वाढल्याचे त्यांच्या मोबाईल एप प्रोफाईलवर दिसू लागले. या कमाईला वाढताना पाहून अनेकांचा विश्वास बसून त्यांच्यात लालसा निर्माण झाली. ५ हजार ते १ लाखापर्यंतची रक्कम गुंतवण्यात आली. परंतू जेव्हा पैसे काढायला गेले तेव्हा टॅक्स वा अन्य फीच्या नावाने आणखीन पैसे मागितले गेले. शेवटची मुद्दलही गेली आणि भरमसाठ मिळणारे व्याज तर मिळालेच नाही.

वकीलाने गमावले 5.93 लाख, चौकशी सुरु

या घोटाळ्यात आतापर्यंत बंगलुरु, टुमकुरु, मंगलुरु आणि हावेरी सारख्या शहरांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. एकट्या हावेरी जिल्ह्यातच आतापर्यंत १५ हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. हावेरी सायबर क्राईमने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. या संदर्भातील अन्य पीडितांशी संपर्क केला जात आहे.