
Nirbhaya Rape Case Pawan Jallad: ‘निर्भया’वर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात आली. अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) अशी आरोपींची नावं होती. त्यांना फाशी देण्यात आली. दरम्यान, देशातील सुप्रसिद्ध जल्लाद पवन यांनी सर्वोच्च न्यायालयात मृत्युदंडाच्या शिक्षेला पर्यायी शिक्षेची मागणी करणाऱ्या याचिकेवर एक महत्त्वाचे विधान केलं आहे. पवन म्हणाले, फाशी दोषींमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचं काम करते. प्राणघातक इंजेक्शनमध्ये ती भीती कुठे आहे? असा प्रश्न देखील पवन यांनी उपस्थित केला.
पवन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा आदर केला आणि म्हटलं की, फाशी ही सर्वात योग्य आणि पारंपारिक पद्धत आहे. खरं तर, फाशीच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी करणारी एक याचिका नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण, केंद्र सरकारला याचिका मान्य नाही. सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि म्हटलं की, वेळेनुसार बदल करायला हवेत…. यामुळे या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
निर्भया प्रकरणातील चार दोषींना फाशी देणाऱ्या देशातील काही जल्लादांपैकी एक पवन जल्लाद यांच्या म्हणण्यानुसार, दोषींना फाशी देण्यासाठी फाशी एक उत्तम पर्या. आहे कारण यामध्ये दोषी हळू – हळू मरण पावतो आणि समाजात एक मोठा संदेश जातो… इंजेक्शमुळे काहीही त्रास होत नाही आणि त्याची भीती देखील नसते…
पवन पुढे म्हणाले, फाशी देणं ही एक पारंपारिक पद्धत आहे आणि गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करते. त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्या फाशी देत आहे आणि ते स्वतः त्याच्या आजोबांसोबत फाशी देण्यासाठी जात असे.
पवन वेळोवेळी मेरठ जिल्हा तुरुंगात हजर राहतात आणि नवीन फाशीच्या आदेशाची वाट पाहत असतात. ‘फाशी दिल्यानंतर जवळपास 15 मिनिटांनंतर आरोपीचा मृत्यू होतो पण अधिकृत घोषणा 30 मिनिटांनंतर केली जाते.’ आर्थिक परिस्थितीबद्दल देखील पवन यांनी मोठं वक्तव्य केलं, त्यांना मेरठ जिल्हा कारागृहातून फक्त 10 हजार रुपये मानधन मिळतं, जे 25 हजार असायला हवं. अशात, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मानधन वाढवण्याची विनंती केली आहे.