निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम

भाजपला मोठा धक्का बसला आहे. युट्यूबर मनीष कश्यप यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का, या नेत्याचा पक्षाला रामराम
Manish Kashyap leave BJP
| Updated on: Jun 08, 2025 | 6:46 PM

देशाच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बिहारमध्ये आगामी काळात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. युट्यूबर मनीष कश्यप यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी (७ जून) रात्री फेसबुकवर लाईव्ह येऊन मनीष कश्यप यांनी ही याबाबत घोषणा केली.

वर्षभपरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश

समोर आलेल्या माहितीनुसार मनीष कश्यप २५ एप्रिल २०२४ रोजी भाजपमध्ये सामील झाले होते, त्यानंतर आता एक वर्षानंतर ते स्वतः पक्षातून बाहेर पडले आहेत. मनीष कश्यप यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, मला बिहार आणि बिहारींसाठी लढायते आहे, मात्र पक्षात राहून मी लोकांचा आवाज योग्यरित्या उठवू शकणार नाहीत. म्हणूनच हा निर्णय घेतला आहे.’ त्यानंतर आता मनीष यांनी निवडणूक कुठे लढवावी याबाबत जनतेची मते मागवली आहेत.

मनीष कश्यप यांना काही दिवसांपूर्वी पटना येथील पीएमसीएच रुग्णालयात डॉक्टरांनी मारहाण केली होती. या घटनेनंत त्यांना भाजपचा पाठिंबा न मिळाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून सतत नाराजी व्यक्त करत होते. यानंतर आता त्यांना पक्षाला रामराम केला आहे.

मनीष कश्यप वादात सापडले होते

मनीष कश्यप हे बिहारी लोकांचा आवाज उठवण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी २०२३ मध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये काही लोक मजुरांना मारहाण करताना दिसत होते. मनीष कश्यप यांच्या मते हा व्हिडिओ तामिळनाडूमधील होता आणि तिथे मजुरांना मारहाण केली जात होती, मात्र तपासात हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले होते.

यानंतर कश्यप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्च २०२३ मध्ये मनीषने यांनी आत्मसमर्पण केले होते, यानंतर त्यांना ९ महिन्यांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला व त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काळांतराने पुराव्याअभावी न्यायालयाने मनीष कश्यप यांची निर्दोष मुक्तता केली होती.

याआधीही लढवली होती निवडणूक

मनीष कश्यप यांनी यापूर्वी निवडणूक लढवली आहे, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. भूमिहार समुदायातून आलेल्या मनीष यांनी नेहमीच राजद आणि इतर पक्षांवर टीका केली आहे. मात्र ते पंतप्रधान मोदींचे मोठे चाहते आहेत आणि त्यांनी मोदींच्या अनेक योजणांना पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.