भारताला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय, अमेरिकेतून वाईट बातमी

डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, दरम्यान त्यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला असून, ज्याचा थेट परिणाम हा भारतावर होण्याची शक्यता आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

भारताला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय, अमेरिकेतून वाईट बातमी
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 18, 2025 | 9:57 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला, या टॅरिफचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी H1B व्हिसाच्या शुल्कामध्ये देखील मोठी वाढ केली, याचा थेट मोठा फटका हा भारताला बसला आहे, कारण अमेरिकेमध्ये जगभरातून जेवढे नागरिक या व्हिसावर जातात त्यातील सत्तर टक्के संख्या ही एकट्या भारताची आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे, ज्याचा मोठा परिणामा हा भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या लोकांवर होणार आहे.

एच-1 बी व्हिसा घेऊन अमेरिकेत जाण्याची वाट पहाणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे, ती म्हणजे या मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आलेली तारीख आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता ऑक्टोबर 2026 नंतरच या व्हिसासाठीच्या मुलाखती होणार आहेत. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान मुलाखती होणार होत्या, मात्र आता यासंदर्भातील तारीख वाढवण्याचा निर्णय अमेरिकन प्रशासनानं घेतला आहे. हा भारतासाठी मोठा झटका मानला जात आहे.

एवढंच नाही तर ज्यांनी एच-1बी व्हिसासाठी अप्लाय केलं आहे, त्यांच्या सोशल मिडिया खात्याची देखील कसून तपासणी होणार आहे, जर या सोशल मीडिया खात्यावर एखादी जरी अमेरिकाविरोधात पोस्ट दिसली किंवा अमेरिकेच्या विरोधातील लिखाण दिसलं तरी तुम्ही व्हिसासाठी केलेला अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या आता या व्हिसासाठीच्या मुलाखतीची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानं याचा मोठा फटका हा भारतामधून अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना होणार आहे. एवढंच नाही तर ज्या महिला गर्भवती आहेत, आणि त्यांना केवळ अमेरिकेचं नागरिकत्व  मिळावं यासाठी अमेरिकेत आपल्या मुलाला जन्माला घालायचं आहे, अशा महिलांचा व्हिसा अर्ज देखील अमेरिकन सरकारकडून रद्द केला जाणार आहे, सर्व अर्जाची कडक तपासणी आता होणार आहे.