AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुर्कियेला मोठा झटका! सेलेबी कंपनीची याचिका हायकोर्टाने फेटाळली, कोर्ट म्हणाले की ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या हिता…’

दिल्ली उच्च न्यायालयाने तुर्कीयेची कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हीसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की सरकारचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेला आहे.

तुर्कियेला मोठा झटका! सेलेबी कंपनीची याचिका हायकोर्टाने फेटाळली, कोर्ट म्हणाले की 'राष्ट्रीय सुरक्षेच्या हिता...'
| Updated on: Jul 07, 2025 | 9:43 PM
Share

तुर्कीने भारत आणि पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला खुला पाठींबा दिला होता. त्यानंतर या देशाचे भारताशी संबंध बिनसले आहेत. भारताने भारतीय विमानतळाला सेवा पुरविणाऱ्या तुर्कीयेच्या कंपनी सेलेबी हिचा परवाना तडकाफडकी रद्द करुन टाकला होता. त्यानंतर ही सेलेबी एअरपोर्ट सर्व्हीसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दिल्ली हायकोर्टात गेली होती. दिल्ली हायकोर्टाने सेलेबी कंपनीची याचिका फेटाळून लावली आहे. काय म्हणाले हायकोर्ट पाहा…

सरकारचा निर्णय न्यायाच्या सिद्धांताविरुद्ध

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने भारतात काम करणारी तुर्कीयेची कंपनी सेलेबी एव्हीएशन होल्डींगची सुरक्षा लायसन्स रद्द केले होते. या प्रकरणात ही कंपनी दिल्ली हायकोर्टात दावा केला. दिल्ली हायकोर्टात २१ मे रोजी सेलेबी कंपनीने सांगितले की भारताचा निर्णय न्याय सिद्धांताच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. नागरी विमानन सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) १५ मे २०२५ रोजी सुरक्षा मंजूरी रद्द केली होती.

ग्राऊंड हॅडलिंग देखरेख करायची कंपनी

सेलेबी एअरपोर्ट सर्व्हीसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशाच्या विविध विमानतळावर गाऊंड हॅडलिंग आणि कार्गो टर्मिनल कार्याच्या देखरेखीचे काम करते. केंद्रीय प्राधिकरणाच्या वकीलांनी ही कारवाई योग्य असल्याचे सांगताना विमानन सुरक्षेसाठी कंपनीकडून अभूतपूर्व धोका असल्याचे म्हटले होते.

‘राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी निर्णय’

सेलेबी कंपनीच्या वकीलांनी सांगितले की नागरिक उड्डयन सुरक्षा ब्युरोचे महासंचालकांनी याचिकाकर्त्यांना शिक्षा देण्यापूर्वी म्हणणे मांडण्याची संधी द्यायला हवी होती आणि कारवाईची कारणे सांगायला हवी होती. केंद्राने १९ मे रोजी कोर्टात सांगितले की मंजूरी रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितातून घेतला आहे. कारण अशी माहीती मिळाली होती की सध्याच्या स्थितीत याचिकाकर्त्याच्या कंपनीची सेवा सुरु ठेवणे धोकादायक सिद्ध होऊ शकते.

९ विमानतळांना सेवा पुरवित होती

सेलेबी भारतीय विमानन क्षेत्रात १५ वर्षांपासून अधिक काळापासून कार्यरत आहे. तसेच या कंपनीत १०,००० हून अधिक लोक कार्यरत आहेत, ही कंपनी ९ विमानतळांना सेवा पुरवित आहे. बीसीएएसने आपल्या आदेशात म्हटले की,’ राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हीसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संदर्भात सुरक्षा मंजूरी तत्काळ प्रभावाने रद्द केली जात आहे. ‘

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?