राफेलबाबत पाकच्या नादाला लागून चीन तोंडावर आपटला, फ्रान्सच्या गुप्त अहवालाने झाली पोलखोल
अलिकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात राफेलबाबत दोन्ही देशांकडून वक्तव्य आली आहेत. यानंतर चीनला पाकवर विसंबने महागात पडले आहे.

भारत आणि पाकिस्तानात पहलगाम हल्ल्यानंतर मोठी संघर्ष उडाला होता. यात पाकिस्तानला चीन आणि तुर्कीये यांनी सढळहस्ते मदत केली हे जगजाहीर झाले आहे.या युद्धात चीनने पाकिस्तानला पुरवलेली शस्रास्रे फेल गेली आहेत. त्याचा वचपा काढण्यासाठी राफेलबाबत चीनने पुड्या सोडायला सुरुवात केली. त्यानंतर फ्रान्सने गुप्त अहवाल जारी करीत चीनवर खोटा प्रोपोगंडा कॅम्पेन राबवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे चीन संतापला आहे.
ऑपरेशन सिंदुरच्या वेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध लढण्यासाठी सर्वतोपरीय मदत चीन केल्याचे उघड झालेले आहे. या तणावात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत राफेलच्या वापराबाबत चीनने प्रोपेगंडा कँपेन सुरु केले. या संदर्भात फ्रान्सने गुप्त अहवाल सादर करीत चीनचा पर्दाफाश केल्याने चीन आता संतापला आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सचा हा गुप्तचर अहवाल फेटाळला आहे. या अहवाल निराधार असून अफवांवर आधारीत असून चीनला बदनाम करण्यासाठी आहे असा आरोप चीनने केला आहे.
चीन मंत्रालयाने म्हटले आहे की चीन सैन्य निर्यातीसाठी जबाबदार आणि विवेकपूर्ण दृष्टीकोन ठेवत आला आहे. क्षेत्रीय, जागतिक शांतता आणि स्थिरतेत रचनात्मक भूमिका निभावत आला आहे. चीन आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संरक्षण उपकरणे विकसित करतो, शस्रास्रांचा दलाल बनण्यासाठी नाही. न दुसऱ्यांना खाली झुकवून स्वत: वर उठण्यासाठी नाही. परंतू याऊलट काही पश्चिमी नेते आणि मीडिया आऊटलेट प्रत्येक गोष्टीकडे विरोधाच्या चष्म्यातून पाहात असून दुसऱ्यावर आपली मानसिकता थोपवण्याचा त्यांचा अहंकार ते किती असुरक्षित आहेत हे दर्शवत आहे.
फ्रान्सच्या गुप्त अहवालाने भडकला चीन
फ्रान्सच्या गुप्त अहवालात ७ जून रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर चीनने राफेलच्या विक्रीला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी चीनने त्याच्या विविध देशातील दुतावासाचा वापर केला. आणि संबंधित देशांना राफेल जेट खरेदी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ज्या देशांची फ्रान्सशी राफेल डील झाली होती. त्यांना सांगितले की राफेल एवढे कार्यक्षम नाहीत जेवढे चीनी फायटर आहेत. त्यामुळे ते खरेदी करावेत असे म्हटले.
ही कहानी तेव्हा सुरु झाली जेव्हा चीनचा मित्र पाकिस्तानने २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर ७ जून रोजी सुरु झालेल्या भारत आणि पाकिस्तान संघर्षात तीन लडाऊ राफेल पाडल्याचा खोटा दावा केला. राफेल बनविणारी कंपनी दसॉ एव्हीएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी हा दावा फेटाळून लावला तेव्हा पाकच्या या दाव्याची हवा निघाली.
